विकासकामे प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प

By Admin | Published: September 25, 2016 01:01 AM2016-09-25T01:01:56+5:302016-09-25T01:01:56+5:30

विनायक राऊत : खवळे महागणपतीला सोन्याचा पाय बसविला

Resolve to take development works progress | विकासकामे प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प

विकासकामे प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प

googlenewsNext

देवगड : लिम्का बुकमध्ये नोंद असलेल्या जगप्रसिध्द खवळे महागणपतीच्या डाव्या पायाला सोन्याचा पाय बसविण्याचे भाग्य मला मिळाले. हा माझ्या आयुष्यातील धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा क्षण कायम लक्षात राहणारा आहे. या खवळे महागणपतीच्याच कृपाशिर्वादाने रत्नागिरी-सिंंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील विकासाची कामे प्रगतीपथावर नेण्याचा संकल्पही केला असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी तारामुंबरी येथील खवळे महागणपतीच्या निवासस्थानी सांगितले.
देवगड तारामुंबरी येथील जगप्रसिध्द असलेल्या खवळे महागणपतीला खवळे कुटुंबियांच्यावतीने सोन्याचा पाय खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते बसविण्यात आला. यावेळी सिध्दीविनायक मंदिर न्यासाचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, खवळे महागणपती ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त सुर्यकांत खवळे, तालुकाप्रमुख विलास साळसकर, शहरप्रमुख संतोष तारी, गजानन प्रभू, दिगंबर जुवाटकर, निलेश सावंत, केतन खाडये, मेघशाम पाटोळे, चंद्रकांत खवळे, भाऊ खवळे, अमेय खवळे आदी उपस्थित होते.
खासदार विनायक राऊत म्हणाले, खवळे महागणपतीची लिम्का बुकमध्ये नोंद झाल्याने जगाचे लक्ष वेधले आहे. खवळे कुटुंबियांनी ३१६ वर्षाची परंपरा आजही अबाधित राखून त्याच धार्मिकेतेच्या दृष्टिकोनातून कुठलाही बदल न करता तशाच स्वरूपात परंपरागत उत्सव साजरा केला जात आहे. २१ दिवसांत तीन रूपात दिसणारा खवळे महागणपती हा अखंड जगात एकमेव गणपती आहे. या महागणपतीवर नुकताच प्रदर्शित झालेला विघ्नहर्ता महागणपती या चित्रपटाच्या माध्यमातून या महागणपतीची ख्याती सर्वदूर पसरली आहे.
या गणपतीची वर्ल्ड रेकॉर्डमध्येही गणना होईल अशी अपेक्षा व असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला. तसेच खवळे महागणपतीच्या ठिकाणचे विकासाच्या दृष्टिकोनातून काम करण्यात येणार असून रस्ता ंदुपदरीकरण व इतर मुलभूत सुविधा प्राप्त करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
गणेशोत्सवामध्ये २१ दिवस विराजमान असलेल्या महागणपतीला विसर्जनानंतरही पर्यटक या स्थळाला नक्कीच भेट देतील. यासाठी याठिकाणी विकासाची कामेही अग्रक्रमाने केली जाणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. देवगड तालुका हा पर्यटनाचे माहेरघर असलेला तालुका म्हणून ओळखला जातो.
तसेच आता या पर्यटन तालुक्याला धार्मिक स्थळांची जोडही मिळत असल्याने देवगड तालुक्याचा पर्यटनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विकास होणार आहे यादृष्टिकोनातून खवळे महागणपतीच्या माध्यमातून आपण सर्वांनी पर्यटनपूरक व्यवसाय करून पर्यटनवाढीचा संकल्प करावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भगवा ध्वज उभारून जामसंडे येथे शिवसेना शाखेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख विलास साळसकर, सिध्दीविनायक न्यासाचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, महिला तालुका आघाडी प्रमुख वर्षा पवार, युवा शिवसेना तालुकाध्यक्ष निनाद देशपांडे, शहर महिला आघाडी प्रमुख अर्चना पाटील, शशिकांत घाडी, अनिकेत पेडणेकर, रूपेश नवलू, दादा पडेलकर आदी उपस्थित होते. खासदार विनायक राऊत यांनी देवगड पोलिस स्टेशनच्या गणपतीचेही दर्शन घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Resolve to take development works progress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.