धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ सोडवा; अबीद नाईक, काका कुडाळकरांनी मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे केली मागणी

By सुधीर राणे | Published: August 11, 2023 04:36 PM2023-08-11T16:36:35+5:302023-08-11T16:39:59+5:30

लवकरच जिल्हा दौरा आयोजित करून पुनर्वसन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले

Resolve the issue of rehabilitation of dam victims immediately; Abid Naik, Kaka Kudalkar demanded relief and rehabilitation from the Minister | धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ सोडवा; अबीद नाईक, काका कुडाळकरांनी मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे केली मागणी

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तात्काळ सोडवा; अबीद नाईक, काका कुडाळकरांनी मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे केली मागणी

googlenewsNext

कणकवली: गेल्या अनेक वर्षापासून काम सुरू असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे महंमदवाडी टाळंबा व इतर धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. ते तत्काळ सोडवावेत. तसेच नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी राज्याचे  मदत व पुनर्वसन मंत्री अनिल  पाटील यांच्याकडे केली. यावेळी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते.

दरम्यान, त्याअनुषंगाने लवकरच जिल्हा दौरा आयोजित करून पुनर्वसन प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी दिले. मुंबई येथे झालेल्या या चर्चेवेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, संजय बोरगे, चिटणीस बाप्पा सावंत, प्रांतीक सदस्य सावळाराम अणावकर, ज्येष्ठ नेते एम. के. गावडे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका प्रज्ञा परब, सूरज परब आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील नरडवे येथील महंमदवाडी धरणाचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. याठिकाणी पुनर्वसनाचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. तसेच टाळंबा धरणाच्या पुनर्वसनाबाबतच्या समस्या प्रलंबित आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत देण्याच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली.

यावेळी मंत्री पाटील व आमदार तटकरे यांनी या हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील असे सांगितले. तसेच अतिवृष्टीतील नुकसानीचा अहवाल मागवून घेऊन देय असलेली सर्व भरपाई तातडीने देण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली. 

Web Title: Resolve the issue of rehabilitation of dam victims immediately; Abid Naik, Kaka Kudalkar demanded relief and rehabilitation from the Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.