सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदार नोंदणीला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 06:12 PM2017-08-05T18:12:27+5:302017-08-05T18:16:19+5:30
सिंधुदुर्गनगरी : तरुण व पात्र प्रथम मतदारांची (वयोगट १८ ते २१ वर्षे) मतदार यादीमध्ये नोंदणी करण्यासाठी दिनांक १ जुलै २0१७ ते दि. ३१ जुलै २0१७ या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात आलेली आहे. या मोहिमेंअतर्गत दि. ८ जुलै व दिनांक २२ जुलै या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करुन तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. या मोहिमेला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग प्राप्त झाला असून त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतदार नाव नोंदणी केलेली आहे. या मोहिमेंतर्गत नाव नोंदणीसाठी एकूण ५ हजार ४८३ अर्ज प्राप्त झालेले आहेत.

आयोगाने युवा मतदारांच्या नोंदणीसाठी निर्धारित केलेले उदिष्ट गाठण्यासाठी यापुढेही काम करणे आवश्यक असल्याने शासनाने दिनांक १ आॅगस्टच्या पत्रान्वये ही मोहिम दिनांक ३१ आॅगस्ट २0१७ पर्यंत चालू ठेवण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. जेणेकरुन भारत निवडणूक आयोगाच्या No Voter to be left behind या घोषवाक्यानुसार राज्यातील प्रत्येक मतदाराची मतदार यादीमध्ये नोंदणी करण्याचे उदिष्ट साध्य करता येईल.
मतदार यादीमध्ये मतदारांचा रंगीत व सुस्प्ष्ट फोटो असावा व त्या अनुषंगाने त्याला रंगीत PVC मतदान ओळखपत्र देता यावे. यासाठी सर्वच मतदारांकडून रंगीत व सुस्पष्ट फोटो प्राप्त करुन घेण्याच्याही सूचना आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचे छायाचित्र कृष्ण धवल स्वरुपात आहेत अथवा छायाचित्र उपलब्ध नाही, अशा मतदारांनी रंगीत, सुस्पष्ट छायाचित्रासह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी-सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयांशी संपर्क साधावा.
निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील नोंदीच्या दुरुस्तीकरिता नमुना न. ८ भरुन दिलेल्या मतदाराचे 1193 PVC-EPIC अतिशय इन्फोटेक लि. मुंबई यांचेकडून प्राप्त झालेली असून त्यांचे तालुक्यांना वाटप करण्यात आलेले आहे व नवीन नोंदणी झालेल्या मतदारांची नावे माहे सप्टेंबर- आॅक्टोंबर २0१७ मध्ये प्रसिध्द होणा-या प्रारुप मतदार यादीमध्ये आल्यानंतर त्यांना PVC – EPIC चे वाटप करण्यात येणार आहे.
भारत निवडणुक आयोगाने सेनादलातील मतदारांची नव्याने मतदार यादी तयार करण्याबाबतचा कार्यक्रम जाहीर केलेला असून यादी तयार करताना सेनादलातील रेकॉर्ड अधिकारी- कमांडींग आॅफीसर यांनी त्याच्या स्तरावर करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार दिनांक १८ आॅक्टोबर २0१७ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या २ हजार ३४६ सैनिक मतदारांची मतदार यादी अस्तित्वात आहे. तथापि, ही मतदार यादी रद्द करुन ती नव्याने तयार करावयाची असल्याने यासंदर्भात सैनिक मतदारांनी नाव नोंदणीसाठी त्यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा.