बाजारपेठेत वाहनांना बाजारादिवशी प्रतिबंध करा, बचतगट महिलांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 04:26 PM2020-02-04T16:26:41+5:302020-02-04T16:31:58+5:30

कणकवली शहरात मंगळवारी रस्त्यावर भरणाऱ्या आठवडा बाजार दिवशी वाहनांवर बाजारपेठेत प्रतिबंध आणावेत, अशी मागणी कनकसिंधु शहर स्तर संघ, बचतगट महिलांच्यावतीने नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 Restrict vehicles to market day by day, demand for savings group women | बाजारपेठेत वाहनांना बाजारादिवशी प्रतिबंध करा, बचतगट महिलांची मागणी

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना कनकसिंधु शहर स्तर संघ, बचतगटाच्या महिलांनी निवेदन दिले.

Next
ठळक मुद्देकनकसिंधु शहरस्तर संघ, बचतगट महिलांची निवेदनाद्वारे मागणीकणकवली पोलिसांचे वेधले लक्ष

कणकवली : शहरात मंगळवारी रस्त्यावर भरणाऱ्या आठवडा बाजार दिवशी वाहनांवर बाजारपेठेत प्रतिबंध आणावेत, अशी मागणी कनकसिंधु शहर स्तर संघ, बचतगट महिलांच्यावतीने नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

अप्पासाहेब पटवर्धन चौक ते पटकीदेवी मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर भरतो. तिथे बाहेरगावातील व्यापाऱ्यांची दुकाने थाटलेली असतात. यातच दुचाकी वाहनचालक तसेच इतर वाहने याच मार्गावरून ये-जा करीत असल्याने बाजारादिवशी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या दिवशी बाजारात वाहनांवर प्रतिबंध आणावेत, अशी मागणी कनकसिंधु शहर स्तर संघ, बचतगट महिलांच्यावतीने नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावर नगराध्यक्षांनी तत्काळ दखल घेत नगरपंचायतीकडून काही ठिकाणी बॅरिकेट लावण्याचे आश्वासन दिले. तर पोलीस निरीक्षकांनी आठवडा बाजारादिवशी दोन पोलीस तैनात करू असे सांगितले.

यावेळी प्रिया सरूडकर, दिव्या साळगावकर, सुहासिनी टकले, विशाखा कोदे, शुभांगी उबाळे, अस्मा बागवान, आनंदी तोरस्कर, सायली लाड, श्वेता नार्वेकर, एन. जे. सुतार, सुचिता टकले, गीतांजली मालंडकर आदी ३० हून अधिक महिला उपस्थित होत्या.

कणकवली शहरात आठवडा बाजारादिवशी मंगळवारी पटवर्धन चौक ते पटकीदेवी मंदिरपर्यंतच्या बाजारपेठेतील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी बाहेरील व्यापाऱ्यांनी दुकाने लावलेली असतात. तसेच कणकवली शहरात बाहेर गावातील लोक आठवडा बाजारासाठी तसेच इतर कामासाठी येत असतात. त्यामुळे लोकांना चालण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत दुचाकी व इतर वाहने बाजारात आणली जातात. त्यामुळे महिलांना व विद्यार्थ्यांना याचा त्रास होत असतो.

काहीवेळा किरकोळ अपघातही घडले आहेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत तसेच नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आठवडा बाजारादिवशी वाहनांना या रस्त्यावर पूर्णत: बंदी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
 

Web Title:  Restrict vehicles to market day by day, demand for savings group women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.