कोरोना बाधित रुग्णांना भेटण्यास नातेवाईकांना प्रतिबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 05:56 PM2021-06-02T17:56:47+5:302021-06-02T17:59:14+5:30

CoronaVirus Sindhudurg : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार कोरोना काळजी केंद्रामधील बाधित रुग्णांना भेटण्यास नातेवाईकांना प्रतिबंध करण्यात आले आहे. या निर्णयास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.

Restricting relatives from visiting corona-infected patients | कोरोना बाधित रुग्णांना भेटण्यास नातेवाईकांना प्रतिबंध

कोरोना बाधित रुग्णांना भेटण्यास नातेवाईकांना प्रतिबंध

Next
ठळक मुद्देकोरोना बाधित रुग्णांना भेटण्यास नातेवाईकांना प्रतिबंधसहकार्य करण्याचे शल्य चिकित्सकांचे आवाहन

सिंधुदुर्ग  : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार कोरोना काळजी केंद्रामधील बाधित रुग्णांना भेटण्यास नातेवाईकांना प्रतिबंध करण्यात आले आहे. या निर्णयास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे.

डॉ. पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा हा रेड झोनमध्ये असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्वच कोविड केअर सेंटरमधील कोरोना बाधित रुग्णाच्या नातेवाईकांना भेटण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार हा निर्णय जिल्ह्यामध्ये घेण्यात आला आहे. या निर्णयास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांनी केले आहे. तरी या नियमांचे पालन न केल्यास पोलीस प्रशासनामार्फत रुग्णालयाच्या आवारात फिरणाऱ्या नातेवाईकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यात देण्यात आला आहे.

Web Title: Restricting relatives from visiting corona-infected patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.