परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर, भातपिकाचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2020 11:48 AM2020-10-06T11:48:21+5:302020-10-06T11:49:47+5:30

Rain, Sindhudurg News, Farmar गेले काही दिवस पडत असलेल्या परतीच्या पावसाने खारेपाटण दशक्रोशीत धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसाचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसत आहे.

Return rain on farmers' roots | परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर, भातपिकाचे मोठे नुकसान

परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर, भातपिकाचे मोठे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देपरतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावरभातपिकाचे मोठे नुकसान, शेतकरी चांगलेच अडचणीत

खारेपाटण : गेले काही दिवस पडत असलेल्या परतीच्या पावसाने खारेपाटण दशक्रोशीत धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसाचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसत आहे.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे ऐन कापणीवेळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. परिपक्व भातपीक जमिनीवर पडून पुन्हा त्याला कोंब येत आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत.

परतीचा पाऊस हा दरवर्षीच असा धुमाकूळ घालीत असतो. सध्या परतीच्या पावसाचा हंगाम सुरू आहे. गेल्या आठवड्याभरात हा पाऊस सायंकाळी किंवा दुपारच्या सुमारास येतो. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस जवळपास दोन ते तीन तास सलग पडतो.

भात कापणीचा हंगाम सुरू असताना परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असल्याने शेतमळ्यामध्ये पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे भातशेतीचे नुकसान होत आहे. पावसामुळे भातशेती आडवी झाल्याने पावसाच्या पाण्यात भिजत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असल्याने ऐन भातकापणीवेळीच पाऊस पडल्याने पीक वाया जात आहे. परतीचा पाऊस असाच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांच्या संकटात वाढ होणार आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार करावा व ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.


खारेपाटण येथे परतीच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेले दिसत आहे.

Web Title: Return rain on farmers' roots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.