वाळू उत्खननाच्या ठिकाणी महसूल विभागाचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 17:36 IST2021-03-06T17:35:09+5:302021-03-06T17:36:33+5:30
Sand Tahsildar Vengurla Sindhudurgnews- वेंगुर्ला तालुक्यातील रेडी खाडीत तरवाडी, पिळणकरवाडी, सौदागरवाडी येथे गेले अनेक महिने रात्रीच्या वेळी अवैध, वारेमाप वाळू उत्खनन व वाहतूक सुरू होती. यावर ४ मार्च रोजी महसूल विभागाने छापा टाकला. मात्र याबाबत त्यांना सुगावा लागल्याने तेथे वाळू काढायच्या होड्या किंवा कामगार सापडले नाहीत; परंतु तेथे कामगारांसाठी बांधलेली झोपडी, वाळू काढण्यासाठी तयार केलेले तुटलेले रॅम्प दिसून आले. त्याची पंचयादी बनविल्याने वाळू काढणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

वाळू उत्खननाच्या ठिकाणी महसूल विभागाचा छापा
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील रेडी खाडीत तरवाडी, पिळणकरवाडी, सौदागरवाडी येथे गेले अनेक महिने रात्रीच्या वेळी अवैध, वारेमाप वाळू उत्खनन व वाहतूक सुरू होती. यावर ४ मार्च रोजी महसूल विभागाने छापा टाकला. मात्र याबाबत त्यांना सुगावा लागल्याने तेथे वाळू काढायच्या होड्या किंवा कामगार सापडले नाहीत; परंतु तेथे कामगारांसाठी बांधलेली झोपडी, वाळू काढण्यासाठी तयार केलेले तुटलेले रॅम्प दिसून आले. त्याची पंचयादी बनविल्याने वाळू काढणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
रेडी खाडीत मागील एक वर्षापासून स्थानिक वाळू तस्करांकडून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू होते. याबाबत त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेच्या वतीने महसूल अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी, मंडल अधिकारी, पोलीस व तलाठी यांना वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली.
यावेळी शिरोडा येथील मंडल अधिकारी भानुदास चव्हाण, शिरोडा तलाठी फिरोज खान, रेडी तलाठी सोळंखी, रेडी कोतवाल कनयाळकर, गांधीनगर कोतवाल परब, रेडी पोलीस नाईक, आदी उपस्थित होते. यापुढे रेडी खाडीत अवैध वाळू उत्खनन व वाळू वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या आदेशान्वये कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी सांगितले. या संयुक्त कारवाईमुळे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार वेंगुर्ला प्रवीण लोकरे यांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले असल्याचे संस्थेचे सीईओ राजन रेडकर यांनी सांगितले.
रेडी येथील वाळू कारवाईप्रसंगी अधिकारी उपस्थित होते.