सिलिका वाळूचे ११ ट्रक महसूलने घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 11:45 AM2021-04-08T11:45:44+5:302021-04-08T11:47:22+5:30

Sand Kankavali Sindhudurg- कणकवली तालुक्यातील कासार्डे परिसरात अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ५ तर ओव्हरलोड वाळू वाहतूक करणारे ६ असे एकूण ११ ट्रक महसूल विभागाने बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले आहेत. या ट्रकवर आता महसूल विभागाकडून काय कारवाई होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Revenue seizes 11 trucks of silica sand | सिलिका वाळूचे ११ ट्रक महसूलने घेतले ताब्यात

कणकवली तहसील कार्यालय परिसरात बुधवारी महसूल विभागाकडून ताब्यात घेतलेले वाळूचे ट्रक उभे करून ठेवण्यात आले आहेत.

googlenewsNext
ठळक मुद्देकासार्डे परिसरात कारवाई दंडात्मक कारवाई होऊन देखील वाळूमाफियांना धाक नसल्याचे झाले स्पष्ट

कणकवली : तालुक्यातील कासार्डे परिसरात अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ५ तर ओव्हरलोड वाळू वाहतूक करणारे ६ असे एकूण ११ ट्रक महसूल विभागाने बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले आहेत. या ट्रकवर आता महसूल विभागाकडून काय कारवाई होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

कासार्डे येथील मायनिंगवर महसूल विभागाने कारवाई करून देखील वाळू उत्खनन आणि अनधिकृत वाळू वाहतूक बंद होण्याचे नाव घेत नाही.जिल्हाधिकारी ते मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत याबाबत तक्रारी होऊन देखील वाळूमाफिया बिनदिक्कतपणे वाळू उपसा करून अनधिकृत वाहतूक करत असल्याचे बुधवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही वाळू वाहतूक स्थानिक ग्रामस्थांनी रोखून महसूल विभागाला याबाबत कल्पना दिली. त्यानंतर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी जात ते वाळूचे ट्रक ताब्यात घेतले. यात अनधिकृत वाळू वाहतूक करणारे ५ तर ओव्हरलोड वाळू वाहतूक करणारे ६ अशा एकूण ११ ट्रकचा समावेश होता. हे सर्व ट्रक कणकवली तहसील कार्यालय परिसरात आणून उभे करण्यात आले आहेत.

या ताब्यात घेतलेल्या ट्रक मध्ये क्रमांक (एम.एच. ०९ ए .एम.३८००), एम. एच.०२ वाय.ए.९८८१ ) , ( एम. एच. १० ए.क्यू. ४५१९ ),( एम.एच. ०८ एच.१२१३),( एम. एच. ०८ एल. ओ.९७०० ), ( एम.एच .०९ सी. यू .३२९९) , ( एम.एच. १२ डी. जी. ६८७८ ), ( एम.एच. ०९ सी. यू. ८२२४ ) , ( एम. एच. ०९ एफ. एल. ७२७७) , ( एम. एच. ०९ बी. सी. ४९७७ ) , ( एम. एच.०९ एफ. एल. ३८०० ) यांचा समावेश आहे.

दरम्यान, संबधित ट्रक मधील वाळूची मोजमापे घेत गुरुवारी दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार आर. जे. पवार यांनी दिली. या कारवाईकडे आता तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागूण राहिले आहे.
 

Web Title: Revenue seizes 11 trucks of silica sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.