एटीपीमुळे साडेतीन कोटींचा महसूल

By admin | Published: February 11, 2015 10:07 PM2015-02-11T22:07:14+5:302015-02-12T00:40:24+5:30

महावितरण कंपनी : २७ हजार ३२१ ग्राहकांनी घेतली सेवा

Revenue of three and a half crores due to ATP | एटीपीमुळे साडेतीन कोटींचा महसूल

एटीपीमुळे साडेतीन कोटींचा महसूल

Next

रत्नागिरी : महावितरण कंपनीने सध्या सर्वत्र स्वयंचलित वीजबिल भरणा केंद्र सुरू केली आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जानेवारी महिन्यात २७ हजार ३२१ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे महावितरणला ३ कोटी ४१ लाख ८ हजार ५०५ रुपयांचा महसूल मिळाला आहे.एटीएमच्या धर्तीवर महावितरण कंपनीने एटीपी मशिन बसवली आहेत. या मशिनव्दारे ग्राहकांना वीज बिल २४ तास भरण्याची सुविधा देण्यात आली आहे.रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण चार एटीपी केंद्र आहेत. रत्नागिरीतील एटीपी केंद्रांतर्गत रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर तालुक्यांतील ग्राहकांना वीजबिल भरता येते. रत्नागिरीतील एटीपी केंद्रावर १२१०१ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे १ कोटी ८६ लाख ८० हजार २३३ रुपयांचा महसूल उपलब्ध झाला आहे.
सावर्डे, गुहागर, चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना चिपळुणातील एटीपी केंद्रावर वीजबिल भरणे शक्य होते. ४ हजार ४१५ ग्राहकांनी याचा लाभ घेतला असल्याने ३९ लाख १६ हजार ५४५ रूपयांचा महसूल मिळाला आहे. खेड तालुक्यातील एटीपी केंद्रावर खेड, लोटे, दापोलीतील ग्राहकांना वीजबिल भरणे शक्य होत असल्याने १८ हजार ५४७ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे २ कोटी २५ लाख ९६ हजार ७७८ रूपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याचे सांगण्यात आले. कणकवलीतील ५ हजार २५७ ग्राहकांनी याचा लाभ घेतल्याने ३८ लाख ८२ हजार ५४० रूपये, तर मालवण केंद्रावर ३ हजार ५१७ ग्राहकांनी ३९ लाख ३९ हजार १८७ रूपयांचे बिल भरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ८७७४ ग्राहकांनी एटीपी केंद्राचा लाभ घेतल्याने ७८ लाख २१ हजार ७२७ रुपये जमा करण्यात आले. दिवसेंदिवस एटीपी मशिनचा वापर बिले भरण्यासाठी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. त्यामुळे या मशिनव्दारे मिळणारा महसूल हा जास्त असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.बँका, पतसंस्थांमधून वीजबिल स्वीकारले जात असले तरी तेथे असलेल्या रांगा यामुळे एटीपी केंद्रावर किंवा आॅनलाईन वीजबिल भरणे सोपे पडते. आॅनलाईन वीजबिल घरबसल्या भरणे सुकर होते. एटीपी केंद्रावरदेखील आता वीजबिल भरण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. सुटीच्या दिवशी बऱ्याच वेळा बिल भरण्यासाठी संबंधित व्यक्ती उपलब्ध नसते, अशावेळी वयोवृध्द किंवा अशिक्षित मंडळींची अडचण होते. काहीवेळा तर मशीन नादुरूस्त असल्याची साधी सूचनासुध्दा लावली जात नाही. त्यामुळे स्वयंचलित वीजबिल भरणा केंद्राबाबत अद्याप काही ग्राहकांमध्ये नाराजी आहे. संबंधित बाबींमध्ये आणखी सुधारणा केल्यास एटीपी केंद्रावर आणखी महसूल वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Revenue of three and a half crores due to ATP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.