आंबा, काजू पिकांबाबत योग्य निर्णय : बाळासाहेब पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 06:51 PM2020-10-26T18:51:06+5:302020-10-26T18:54:40+5:30
Congress, zp, ncp, fruit, sindhudurgnews यावर्षी पावसाने मोठी हानी झाली. शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळणे गरजेचे आहे. आंबा व काजू पिकांच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कुडाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी पक्षात प्रवेश केला.
कुडाळ : यावर्षी पावसाने मोठी हानी झाली. शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळणे गरजेचे आहे. आंबा व काजू पिकांच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कुडाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांनी पक्षात प्रवेश केला.
जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी मंत्री प्रवीण भोसले, राज राजापूरकर, माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, युवकचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक, सावळाराम अणावकर, रवींद्र चव्हाण, शिवाजी घोगळे, तालुकाध्यक्ष भास्कर परब, बाळ कनयाळकर, पुंडलिक दळवी, प्रमोद धुरी, पूजा पेडणेकर, चित्रा देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी पाटील यांनी ह्ययेवा कोकण आपलाच आसाह्ण अशा मालवणी भाषेत भाषणाला सुरुवात करीत उपस्थितांची मने जिंकली. आमचे नेते पवार यांचे कोकणावर फार प्रेम आहे. जिल्ह्यातील सहकाराचा, सोसायट्यांचा, पीक कर्जाबाबतीत आढावा घेतला आहे. येत्या काही दिवसांत जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन आढावा घेणार आहे. जिल्हा नियोजन समितीत तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना समान वाटा देण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसला काहीजण सोडून गेले. पण येथील जनता पवारांच्या पाठीशी आहे.
कुडाळकरांचा योग्य सन्मान : पाटील
पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव राहील. तसेच पक्षात प्रवेश केलेल्या काका कुडाळकर यांचा योग्य तो सन्मान करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी दिले. कोकणात पर्यटकांसाठी दुचाकी परवानगी गोव्याच्या धर्तीवर दिली जाईल, अशी घोषणा सहकार आणि पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कुडाळ येथील कार्यक्रमात केली.
काका कुडाळकर हे माझ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आमच्या पक्षात प्रवेश करतील असे कधीही वाटले नव्हते. पाटील हे जरी मंत्री असले तरी कार्यकर्त्यांशी नाळ जुळलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते संपर्कमंत्री म्हणून जिल्ह्याला लाभले हे भाग्य आहे. शिवसेनेलासुद्धा कळेल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यात काय आहे. शिवसेनेने जर विश्वासात घेतले नाही तर आम्हांला पण स्वतंत्र पर्याय आहे. याचा शिवसेनेने विचार करावा.
- अमित सामंत,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
महाआघाडीची सत्ता आहे. मात्र पालकमंत्री उदय सामंत यांचे काम एकतर्फी आहे. ते कोणत्याही उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. आमचे नेते अजित पवार राज्याचे अर्थमंत्री आहेत. तसेच इतर आमच्या नेत्यांचाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात निधी मोलाचा वाट आहे. सत्तेतील वाटेकरी असताना पालकमंत्री दुजाभाव का करतात. हे त्यांचे वागणे आघाडीसाठी योग्य नाही.
- बाळ कनयाळकर,
नेते, राष्ट्रवादी