काँग्रेसच्या ध्येयधोरणासंबंधी अधिकार दळवींना

By admin | Published: December 15, 2015 11:12 PM2015-12-15T23:12:40+5:302015-12-16T00:18:17+5:30

सतीश सावंत : वेंगुर्लेत काँग्रेसची मासिक बैठक

For the rights of the Congress, the Dalvi | काँग्रेसच्या ध्येयधोरणासंबंधी अधिकार दळवींना

काँग्रेसच्या ध्येयधोरणासंबंधी अधिकार दळवींना

Next

वेंगुर्ले : भाजप सरकारच्या महागाईविरोधात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन व एक महिन्यात काँग्रेस पक्षाची पुनर्रचना करणे, अकार्यक्षम पदाधिकाऱ्यांना बदलून कार्यक्षम पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार तालुकाध्यक्ष मनीष दळवी यांना दिल्याचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी जाहीर केले.वेंगुर्ले तालुका काँग्रेसची मासिक सभा येथील साई मंगल कार्यालयात जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व काँगे्रस तालुकाध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी लोकसभा मतदारसंघाचे युवक काँग्रेस अध्यक्ष आनंद शिरवलकर, वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती स्वप्नील चमणकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निकिता परब, माजी सभापती जगन्नाथ डोंगरे, जयप्रकाश चमणकर, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष सुजाता देसाई, मच्छिमार नेते वसंत तांडेल, माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, माजी जिल्हा परिषद सभापती दादा कुबल आदी उपस्थित होते.यावेळी खजिनदार समीर कुडाळकर, माजी सरपंच विजय रेडकर, देवू साळगावकर, इर्शाद शेख, प्रशांत आजगावकर, सरपंच संतोष गावडे, जयंत मोंडकर, कमलेश गावडे, नीलेश चमणकर, पपू परब, संदीप देसाई, मारूती दोडशानट्टी, सरपंच इनासिन फर्नांडिस, संदीप पेडणेकर, मातोंड सरपंच उमेश परब, वजराट सरपंच रेश्मा सावंत, तुषार साळगावकर, सदानंद तुळसकर, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

पदाधिकाऱ्यांचा सत्कार
वेंगुर्ले शहर अध्यक्षांची नवीन नियुक्ती, आवश्यकतेनुसार विभागीय कार्यकारिणीत बदल केले जाणार आहेत. यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यामध्ये कोचरा उपसरपंच, होडावडा उपसरपंच रूपल परब, तुळस उपसरपंच संदीप पेडणेकर, विभागीय अध्यक्ष राजबा सावंत यांचा सतीश सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: For the rights of the Congress, the Dalvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.