नदीपात्रातील भरावामुळे पाणी भरण्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 06:24 PM2020-06-18T18:24:21+5:302020-06-18T18:25:13+5:30
महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना ठेकेदार कंपनीने जानवली पुलाजवळ नदीपात्रात मातीचा भराव केला आहे. सध्या जोरदार पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्रातील पाणी वाढत आहे. यापुढेही पावसाचा जोर कायम राहिल्यास कलमठ महाजनीनगरमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कणकवली : महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना ठेकेदार कंपनीने जानवली पुलाजवळ नदीपात्रात मातीचा भराव केला आहे. सध्या जोरदार पडणाऱ्या पावसामुळे नदीपात्रातील पाणी वाढत आहे. यापुढेही पावसाचा जोर कायम राहिल्यास कलमठ महाजनीनगरमध्ये पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कणकवली तालुक्यात पावसाने जोर केला आहे. त्यामुळे नदी, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. जानवली नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यातच महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत जानवली नदीवर पूल बांधण्यात येत आहे. त्यासाठी नदीपात्रात ठेकेदार कंपनीने मातीचा भराव केला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी बाहेर पडणार असून ते कलमठ महाजनीनगरमध्ये घुसण्याची दाट शक्यता मंगळवारी सायंकाळी निर्माण झाली होती.
त्यामुळे त्या परिसरातील रहिवासी चिंतातूर झाले होते. दरम्यान, याबाबत माहिती समजताच तहसीलदार रमेश पवार, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, नागावकर यांनी जानवली पुलाजवळ जाऊन पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री, ऋषिकेश कोरडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
जानवली पुलाच्या कामाबाबत खबरदारी आवश्यक
जानवली पुलाचे सध्या काम सुरू असून अर्धा स्लॅब घालण्यात आला आहे. हा स्लॅब घालताना त्याला देण्यात आलेले ह्यसपोर्टह्ण पावसाच्या पाण्यामुळे हलले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्या कामाची तांत्रिकदृष्ट्या पाहणी करूनच पुढील काम करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.