पाचलचा धोका टळला

By Admin | Published: July 1, 2015 10:39 PM2015-07-01T22:39:40+5:302015-07-02T00:27:20+5:30

राजापूर तालुका : गाळ उपसल्याने पाण्याचा प्रवाह जैसे थे

The risk of pandemic is avoided | पाचलचा धोका टळला

पाचलचा धोका टळला

googlenewsNext

राजापूर : पूर्व परिसरातून वाहणाऱ्या अर्जुना नदीचा वक्र झालेला प्रवाह शासनाच्या लघुपाटबंधारेच्या यांत्रिक विभागाने आतील गाळ उपसल्याने पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका टळला आहे.
पाचल बाजारपेठेला मागील काही वर्षांपासून अर्जुना नदीचा धोका होता. दरवर्षी महापुराच्या पाण्यात नदीकाठची होणारी धूप यामुळे लगतच्या ओणी, अणुस्कुरा मार्गासहीत पाचल बाजारपेठेला धोका वाढला होता. दरवर्षी तो वाढतच होता. हा धोका लक्षात घेऊन मागील अनेक वर्षे प्रशासकीय पातळीवर अनेकवेळा पत्रव्यवहाराद्वारे प्रयत्न करण्यात आले. पण ते अपूर्ण पडले. परिणामी पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका कायम होता. या पार्श्वभूमीवर पाचलचे माजी ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शंकर ऊर्फ अण्णा पाथरे यांनी सातत्याने जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता. बाजारपेठेला निर्माण झालेल्या धोक्याबाबत उपाययोजना त्यांनी करण्याबाबत विनंती केली होती.
त्याची दखल प्रशासनाने घेतली व पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी अर्जुना नदीपात्रातील एकूण तीन ठिकाणी गाळ उपशाचे काम हाती घेतले. काही फूट नदीपात्रातील गाळ उपसून तो काठावर टाकण्यात आला. यामुळे नदीचे पात्र अधिकच रुंद झाले.
या कामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्या उमा शंकर पाथरे यांच्या हस्ते पार पडले. त्याप्रसंगी गावचे उपसरपंच किशोर नारकर, लघुपाटबंधारे विभागाचे कशेळकर, भोसले, एकनाथ शेलार, किसन शेलार, मनोहर पाटील, ग्रामस्थ शिरीष सक्रे, सुशांत वायकूळ, अण्णा पाथरे, प्रसाद पायरे, मंगेश पाथरे, गजानन नेवरेकर, हेमंत नारकर, वसंत चव्हाण, विजय लांजेकर, राजन लब्धे, बब्या बंदरकर उपस्थित होते. अर्धा ते १ किमीच्या भागात नदीच्या प्रवाहाचा धोका निर्माण झाला होता. नेमके त्याच ठिकाणी पाचल पेठवाडीवासीयांची स्मशानभूमी, जांगलदेव देवस्थान व गणेश विसर्जन घाट अशी महत्त्वाची ठिकाणे होती.
पावसाळी दिवसात अर्जुना नदीला महापूर आल्यानंतर लगतची स्मशानभूमी पाण्याखाली जायची. त्यामुळे अडचण होत असे. गणेश विसर्जनाच्या वेळीही पुराच्या पाण्यामुळे अडथळा यायचा. या सर्व समस्यांबाबत पाचलचे सामाजिक कार्यकर्ते अण्णा पाथरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर अडचण समजावून सांगितली. शिवाय सातत्याने पत्रवहार करुन पाठपुरावा सुरुच ठेवला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. प्रशासनाने सरत्या उन्हाळी हंगामात जेसीबी मशिनद्वारे अर्जुना नदीपात्रात साचलेल्या अनावश्यक गाळाचा उपसा केला. त्यामुळे सुरु झालेल्या पावसाळ्यात नदीला आलेल्या पहिल्या पुराचा प्रवाह संथ होता. परिणामी पाचल बाजारपेठेला निर्माण झालेला धोका टळला आहे.
प्रशासनाने योग्यवेळी कार्यवाही केल्याने पाचलचे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अण्णा पाथरे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागासहीत त्यांच्या यांत्रिक विभागाचे अधिकारी यांना धन्यवाद दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The risk of pandemic is avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.