कोकण विद्यापीठ निर्मितीची कार्यवाही न केल्यास रस्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:33 AM2019-06-21T11:33:34+5:302019-06-21T11:34:24+5:30

कोकणातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापीठ सुरू करण्यात यावे.अशी मागणी कोकणवासीयांनी सातत्याने केली आहे. मात्र, अजूनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येत्या दोन महिन्यात कोकण विद्यापीठ निर्मितीची कार्यवाही करण्यात आली नाही तर मुंबई - गोवा महामार्गावर ठिकठिकाणी विद्यार्थी, पालकांसह रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल .असा इशारा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे स्वतंत्र कोकण राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी दिला आहे.

Road blocking agitation if the Konkan University does not take action | कोकण विद्यापीठ निर्मितीची कार्यवाही न केल्यास रस्ता रोको आंदोलन

कोकण विद्यापीठ निर्मितीची कार्यवाही न केल्यास रस्ता रोको आंदोलन

Next
ठळक मुद्देकोकण विद्यापीठ निर्मितीची कार्यवाही न केल्यास रस्ता रोको आंदोलनस्वतंत्र कोकण राज्य संघटनेचा इशारा ; मुख्यमंत्र्यांना निवेदन

कणकवली : कोकणातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापीठ सुरू करण्यात यावे.अशी मागणी कोकणवासीयांनी सातत्याने केली आहे. मात्र, अजूनही त्याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येत्या दोन महिन्यात कोकण विद्यापीठ निर्मितीची कार्यवाही करण्यात आली नाही तर मुंबई - गोवा महामार्गावर ठिकठिकाणी विद्यार्थी, पालकांसह रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल .असा इशारा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एका निवेदनाद्वारे स्वतंत्र कोकण राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी कणकवली प्रांताधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील महाविद्यालयांना भेटी दिल्या आहेत. तसेच प्राचार्य, प्राध्यापक , विद्यार्थी यांच्या संयुक्त सभाही घेतल्या आहेत. यावेळी स्वतंत्र कोकण विद्यापीठ झालेच पाहिजे .अशी मागणी आमच्याकडे सर्वांनी केली आहे. याबाबत प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदने पाठविली आहेत.

गेल्या विधानसभा अधिवेशनाच्यावेळी लोकप्रतिनिधींनी या विद्यापीठाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी शिक्षणमंत्र्यांनी रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापीठ सुरू करण्यास आपण सकारात्मक असल्याचे सांगितले होते. मात्र, पुढील कार्यवाही अद्याप झालेली नाही.

विदर्भ, कोकण, मराठवाडा, प. महाराष्ट्र हे महाराष्ट्राचे चार प्रादेशिक विभाग आहेत. कोकण सोडून प्रत्येक विभागात विद्यापीठे आहेत. परंतु कोकण विभागात एकही विद्यापीठ नाही. हा कोकणावर अन्याय आहे.

कोकण महसूल विभागात मुंबई विद्यापीठ आहे. पण ते भारतीय विद्यापीठ झाले आहे. त्यात देशातील आणि विदेशातील लाखो विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे कोकणी विद्यार्थी दुर्लक्षित होतो.

शैक्षणिक दर्जाबरोबरच वेळच्या वेळी परीक्षा घेऊन त्यांचा योग्य वेळी निकाल लावणे. उच्च शैक्षणिक दर्जा ठेवणे व संशोधन करणे ह्या तिन्ही गोष्टीत मुंबई विद्यापीठाला अपयश आले आहे. कोकणला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. सर्वच जैवविविधता आहे. मात्र, संशोधनाच्या नावाखाली बोंब आहे.

गुणवत्तेच्या दृष्टीने जगातील पहिल्या २०० विद्यापीठात भारतातील एकाही विद्यापीठाचे नाव नाही. भारतातील गुणवत्ताधारक विद्यापीठात सातवा नंबर पुणे विद्यापीठाचा आहे. तर मुंबई विद्यापीठ पहिल्या १०० विद्यापीठातही नाही. ही शर्मेची गोष्ट आहे. त्यामुळे कोकण विद्यापीठ झाल्याने उत्तम शैक्षणिक दर्जा निर्माण होईल . कोकणातील साधन संपत्तीवर आधारित रोजगाराभिमुख नवीन अभ्यासक्रम सुरू करता येतील. संशोधनाला गती येईल तसेच विद्यार्थी, पालक, प्राध्यापक , प्राचार्यांचा वेळ व पैसा वाचेल.

आज कोकण बोर्डाचे महाराष्ट्रात दरवर्षी एस. एस. सी. ,एच. एस. सी.चे निकाल प्रथम क्रमांकाचे असतात. कारण कोकणी विद्यार्थी बुद्धिमान व प्रतिभावंत आहेत. कोकण विद्यापीठ झाल्यानंतर जगातील प्रथम २०० विद्यापीठात त्याचा वरचा क्रमांक असेल . सिंधुदुर्ग व रत्नागिरीत विद्यापीठाची केवळ उपकेंद्रे सक्षम करून ती विद्यापीठाची जागा घेऊ शकणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर कोकण विद्यापीठ निर्मितीची कार्यवाही सुरू करावी . असेही या निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Road blocking agitation if the Konkan University does not take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.