महामार्गाचे काम रोखले, खारेपाटण येथील घटना, ग्रामस्थ आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 11:44 AM2019-12-03T11:44:14+5:302019-12-03T11:47:15+5:30
मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असून, खारेपाटण येथील संभाजीनगर-गुरववाडी येथील ग्रामस्थांनी त्यांच्या असलेल्या समस्यांसाठी रोखले. याबाबत प्राधिकरणच्या वरिष्ठांना माहिती मिळाल्यानंतर कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अमोल ओटवणेकर यांनी तत्काळ ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महामार्गाचे काम पूर्ववत सुरू करण्यात आले.
खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू असून, खारेपाटण येथील संभाजीनगर-गुरववाडी येथील ग्रामस्थांनी त्यांच्या असलेल्या समस्यांसाठी रोखले. याबाबत प्राधिकरणच्या वरिष्ठांना माहिती मिळाल्यानंतर कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अमोल ओटवणेकर यांनी तत्काळ ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महामार्गाचे काम पूर्ववत सुरू करण्यात आले.
यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, उपसरपंच ईस्माईल मुकादम, ग्रामपंचायत सदस्य व गुरववाडी संभाजीनगर ग्रामस्थ महेंद्र गुरव, शमशुद्दीन काझी, शंकर राऊत, योगेश पाटणकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, ग्रामविकास अधिकारी आर. जी. वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. ओटवणेकर व महामार्ग प्राधिकरणचे रणधीरकुमार चतुर्वेदी यांच्याशी खारेपाटणवासीयांनी चर्चा करून आपल्या विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. या सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन ओटवणेकर यांनी ग्रामस्थांना दिले.
चौपरीकरण कामात रस्ता तोडला; ग्रामस्थांनी मांडल्या विविध समस्या
खारेपाटण टाळेवाडी येथील महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने बांधण्यात आलेल्या लिशा रिसॉर्ट या इमारतीकडे जाणारा रस्ता चौपदरीकरणाच्या कामात तोडल्याने या रिसॉर्टकडे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे तो रस्ता बनविण्यात यावा, अशी मागणी सरपंच राऊत यांनी केली. तसेच खारेपाटण महामार्गावरील नृसिंह मंदिर येथून कालभैरव मंदिराकडे पायवाट जात असल्यामुळे येथे दुभाजक न ठेवता रस्ता बनविण्यात यावा, अशी मागणीही राऊत यांनी केली.