रस्त्यांची कामे नियमबाह्य

By admin | Published: September 28, 2016 10:51 PM2016-09-28T22:51:11+5:302016-09-28T23:57:34+5:30

स्थायी समिती सभा : वैभववाडीत हॉटमिक्स डांबर न वापरता कोल्डमिक्सचा वापर

Road works are out of order | रस्त्यांची कामे नियमबाह्य

रस्त्यांची कामे नियमबाह्य

Next

सिंधुदुर्गनगरी : वैभववाडी तालुक्यात रस्त्यांच्या डांबरीकरणाची तब्बल सात कामे नियमबाह्य झाल्याचे बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत उघड होताच एकच खळबळ उडाली. रस्त्यांची कामे करताना हॉटमिक्स डांबर न वापरता कोल्डमिक्स डांबर वापरत संबंधित ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. त्यामुळे या सर्व कामांची बिले संबंधित ठेकेदारांना अदा केली जाणार नसल्याचे कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर यांनी सभागृहात जाहीर केले.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सभाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी विषय समिती सभापती दिलीप रावराणे, आत्माराम पालेकर, रत्नप्रभा वळंजू, समिती सदस्य रणजीत देसाई, प्रमोद कामत, रेवती राणे, श्रावणी नाईक, पुष्पा नेरुरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल रेडकर, आधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.
वैभववाडी तालुक्यात ‘ब’ गटातील रस्त्यांची सात कामे हॉटमिक्स ऐवजी कोल्डमिक्सने केल्याचे उघड झाल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी बिले अदा केली जाणार नसल्याची घोषणा केली, या चर्चेत सभापती दिलीप रावराणे यांनी सहभाग घेतला. कणकवली तालुक्यातील लोरे नं. १ येथील शाळेत शिकविणाऱ्या शिक्षिका आपसात भांडणे करतात. त्यामुळे एका शिक्षिकेची बदली करण्यात आली आहे. बदली ही त्यावर कारवाई नसून त्यांची एकप्रकारची सोय झालेली आहे. त्यामुळे बदलीऐवजी त्या दोन्ही शिक्षिकांवर कारवाई करा. असे आदेश सभाध्यक्ष नाडकर्णी यांनी दिले. (प्रतिनिधी)

सावंतवाडी पंचायत समिती इमारतीला धोका
सावंतवाडी पंचायत समितीची इमारत धोकादायक असल्याचे स्ट्रक्चरल आॅडीटच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एस. खांडेकर यांनी सांगितले. त्यामुळे हा धोका लक्षात घेता तेथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविणे गरजेचे आहे. यासाठी खासगी इमारतींमध्ये पंचायत समितीचे कामकाज हलवा. अशा सूचना करण्यात आल्या.

तळेरे-वैभववाडी रस्ता चौकशीच्या फेऱ्यात
तळेरे-वैभववाडी या तीस किलोमीटर लांबीच्या पट्ट्यातील ९ किलोमीटर रस्त्याचे काम मे महिन्यात पूर्ण करण्यात आले. यासाठी तीन कोटी ५७ लाखांचा निधी खर्ची घालण्यात आला.
मात्र हा रस्ता पहिल्याच पावसात खराब झाल्याचे सभागृहात स्पष्ट करण्यात आले. हा रस्ता चांगला असल्याचे क्वालिटी कंट्रोलच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिले आहे.
असे असतानाही रस्ता खराब होतो. या मागे अर्थकारण असून सरसकट सर्वांची चौकशी करा. अशी मागणी दिलीप रावराणे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी यावेळी केली.


तळेरे-वैभववाडी रस्ता चौकशीच्या फेऱ्यात
तळेरे-वैभववाडी या तीस किलोमीटर लांबीच्या पट्ट्यातील ९ किलोमीटर रस्त्याचे काम मे महिन्यात पूर्ण करण्यात आले. यासाठी तीन कोटी ५७ लाखांचा निधी खर्ची घालण्यात आला.
मात्र हा रस्ता पहिल्याच पावसात खराब झाल्याचे सभागृहात स्पष्ट करण्यात आले. हा रस्ता चांगला असल्याचे क्वालिटी कंट्रोलच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र दिले आहे.
असे असतानाही रस्ता खराब होतो. या मागे अर्थकारण असून सरसकट सर्वांची चौकशी करा. अशी मागणी दिलीप रावराणे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी यावेळी केली.
चिपीला पाणी देण्यास विरोध
चिपी विमानतळाच्या कामाला लागणारे पाणी देण्यास आमचा विरोध असल्याचे रणजीत देसाई यांनी स्पष्ट केली. भंगसाळ नदीचे पाणी हे कुडाळ शहराबरोबर लगतच्या गावांना पुरते. त्यामुळे या नदीचे पाणी चिपीला देण्यास आमचा विरोध असल्याचे ते म्हणाले.
आमचा गाव, आमचा विकास योजनेअंतर्गत शासनाकडून तिसऱ्या हप्त्यापोटी सिंधुदुर्गला १४ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. आतापर्यंत एकूण ३६ कोेटी रुपये प्राप्त झाले आहेत. संबंधित रक्कम ग्रामपंचायतींकडे वर्ग करण्याचे काम सुरू असल्याचे रणदिवे यांनी सांगितले.
सभागृहात रस्त्यांच्या विषयावर गरमागरम चर्चा झाली. त्यानंतर व्हटकर आपल्या जागी बसून एका सहकाऱ्यासोबत हसले. हा सर्व प्रकार सभापती दिलीप रावराणे यांनी पाहताच त्यांनी ‘व्हटकर यांनी पदाधिकाऱ्यांना कसे गुंडाळले, हसा, तुमच्या भावना आम्हाला समजल्या’. या शब्दात व्हटकर यांना सुनावले.

Web Title: Road works are out of order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.