सासोलीतील रस्ता खचला

By Admin | Published: March 27, 2015 10:11 PM2015-03-27T22:11:32+5:302015-03-28T00:07:45+5:30

मातीच्या भरावाने बुजविण्याचा प्रयत्न : भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले

The roads in Sasoli fell short | सासोलीतील रस्ता खचला

सासोलीतील रस्ता खचला

googlenewsNext

कसई दोडामार्ग : दोडामार्ग- बांदा रस्त्यावरील सासोली मंदार हॉलनजीक असलेल्या धोकादायक वळणावरील डांबरी रस्ता शुक्रवारी सकाळी खचल्याचे निदर्शनास आले. धोकादायक वळणावर रस्ता खचला असतानाच मणेरी ते वेंगुर्ले अशी नळपाणी योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम करणाऱ्या कामगारांनी लागलीच जेसीबीच्या सहाय्याने मातीचा भराव टाकून बुजविण्याचा प्रयत्न केल्याने संतप्त भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, काँग्रेसचे सासोली मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बाळा धाऊसकर यांनी घटनास्थळी जाऊन नळपाणी योजनेच्या पाईपलाईन टाकण्याचे काम बंद पाडले. तसेच जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकामचे संबंधित वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी येत नाहीत, तोपर्यंत काम बंद ठेवावे, असा सक्त इशाराही म्हापसेकर व धाऊसकर यांनी दिला.
या पाईपलाईनमुळे पावसाळ्यात रस्ता खचण्याची शक्यता लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली होती. ही शंका बुधवारी पडलेल्या पावसामुळे खरी ठरली. पाईप लाईनच्या ठिकाणी टाकलेला मातीचा भराव दबला गेला तर सासोली दरम्यान पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरू होते, त्या ठिकाणी धोकादायक वळणावरच शुक्रवारी सकाळी एका बाजूने पूर्ण खचून गेला. असे असताना त्या कामगारांनी तत्काळ लोकांच्या भीतीपोटी मातीचा भराव टाकून तात्पुरता बुजविला, असे राजेंद्र म्हापसेकर व बाळा धाऊसकर यांना समजताच त्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली व धोकादायक वळणावरच रस्ता खचल्याचे पाहून काम बंद पाडले. दरम्यान, काँग्रेसचे पदाधिकारी बाबा टोपले व ग्रामस्थ त्याठिकाणी जमा झाले होते.

Web Title: The roads in Sasoli fell short

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.