सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने रस्ते गेले पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 03:43 PM2021-06-16T15:43:39+5:302021-06-16T15:45:42+5:30
Rain Sindhudurg : मुसळधार पावसाचा मोठा फटका वैभववाडी तालुक्याला बसला असून पावसाने वैभववाडी तालुक्याला झोडपून काढले. सकाळपासून पाऊस जोरदार कोसळत असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गावातील व वाड्यावस्तीमधील काँजवे व मोऱ्या पाण्याखाली गेल्या. त्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला आहे.
वैभववाडी : मुसळधार पावसाचा मोठा फटका वैभववाडी तालुक्याला बसला असून पावसाने वैभववाडी तालुक्याला झोडपून काढले. सकाळपासून पाऊस जोरदार कोसळत असल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गावातील व वाड्यावस्तीमधील काँजवे व मोऱ्या पाण्याखाली गेल्या. त्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला आहे.
वैभववाडी झ्र गगनबावडा मार्गावर एडगाव नजीक रस्त्यात आकेशियाचे झाड पडल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.मात्र पावसाने दुपारच्या सुमारास उघडीप घेतल्याने अनर्थ टळला. वैभववाडी तालुक्यातील करुळ घाट मार्गात चिखलमाती आल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू होती.
रात्रभर तालुक्यात संततधार पाऊस सुरू होती. मात्र सकाळपासून पावसाने रौद्ररूप धारण केले. वैभववाडी तालुक्यातील सुख व शांती या प्रमुख नद्यांना पुर आला आहे. पावसाने जोर असाच राहील्यास रस्ते पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत.