भूसंपादन प्रकरणात जिल्हा महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 05:37 PM2021-01-28T17:37:59+5:302021-01-28T17:40:28+5:30
Kudal Sindhdudurg- सांगिर्डे येथील इमारत क्रमांक ४०५६ भूसंपादन मोबदला परमार प्रकरणात जिल्हा महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी करीत, संगनमताने केलेल्या शासननिधी अपहारप्रकरणी संबंधितांवर कारवाईस एवढा विलंब का होतोय? जिल्ह्याच्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी या भ्रष्ट कारभाराची दखल घेणार का? असे सवालही उपस्थित केले आहेत.
कुडाळ : सांगिर्डे येथील इमारत क्रमांक ४०५६ भूसंपादन मोबदला परमार प्रकरणात जिल्हा महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे, असा आरोप मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी करीत, संगनमताने केलेल्या शासननिधी अपहारप्रकरणी संबंधितांवर कारवाईस एवढा विलंब का होतोय? जिल्ह्याच्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी या भ्रष्ट कारभाराची दखल घेणार का? असे सवालही उपस्थित केले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ उपक्रमात कुडाळ सांगिर्डे येथील इमारत क्रमांक ४०५६ भूसंपादन मोबदला प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख विभाग व मांगीलाल परमार यांनी खोटा व बनावट प्रस्ताव बनवून संघटितपणे भ्रष्टाचार करीत शासनाचे ४७ लाख ११ हजार रुपये मोबदला रक्कम हडपल्याप्रकरणी सक्षम प्राधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी सादर आहेत. मात्र, त्यावर अद्याप फौजदारी प्रकारची कारवाई होत नाही. हे पाहता महसूल प्रशासनच अशा भ्रष्टाचाराला खत-पाणी घालत असून भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याची चर्चा सर्वसामान्य जनतेमध्ये आहे.
अन्यथा जनतेत चुकीचा संदेश जाण्याची भीती
या गंभीर प्रकरणात आता जिल्ह्याच्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून तत्काळ कारवाईचे आदेश निर्गमित करावेत. अन्यथा जिल्हा प्रशासन भ्रष्ट कारभाराबाबत गंभीर नसून व भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा चुकीचा संदेश जनतेमध्ये जाण्याची भीती आहे. यामुळे भविष्यात भ्रष्टाचार वाढीस लागून अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होतील, अशी भीती मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केली आहे.