बीडमध्ये सुगंधाने दरवळला ‘रोझ डे’ !
By Admin | Published: February 7, 2016 11:43 PM2016-02-07T23:43:25+5:302016-02-08T00:23:07+5:30
सोमनाथ खताळ , बीड प्रत्येक दिवस तसा प्रेमाचाच. परंतु ‘व्हॅलेंटाईन’ सप्ताहाचे एक वेगळेच महत्व आणि आकर्षण. आपल्या जोडीदाराला फुल दिल्यावर तर यात आणखीणच बहार येते.
सोमनाथ खताळ , बीड
प्रत्येक दिवस तसा प्रेमाचाच. परंतु ‘व्हॅलेंटाईन’ सप्ताहाचे एक वेगळेच महत्व आणि आकर्षण. आपल्या जोडीदाराला फुल दिल्यावर तर यात आणखीणच बहार येते. हाच फुल देण्याचा दिवस म्हणजे ‘रोझ डे’. व्हॅलेंटाईन सप्ताहाची सुरूवातही याच दिवसाने होते. परंतु यावर्षी हा दिवस रविवारी सुटीच्यावेळी आल्याने महाविद्यालयीन युवक, युवतींचा चांगलाच हिरमोड झाला. परंतु तरीही अनेकांनी या दिवसाचा दरवळणारा सुगंध कमी होऊ दिला नाही.
प्रेमविरांचा आवडता सप्ताह म्हणजे ‘व्हॅलेंटाईन’. या सप्ताहातील विविध सात दिवस तरूणाई आपल्या ‘प्रिय’ व्यक्तिसोबत आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न करते. आपल्या ‘प्रेमा’ची आठवण म्हणून अनेकजण फुल देतात. फुले ‘मन’ जोडण्याचे काम करतात, म्हणून सप्ताहाची सुरूवात ‘रोझ डे’ ने झाली. बीडमध्ये तरूणाई बरोबरच सुशिक्षित लोकांनीही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रत्येक गुलाब आपला वेगळा ‘भाव’ आणि त्यातील ‘प्रेम’ प्रदर्शित करत होता. अनेकांनी आपल्या आपल्या पद्धतीने फुले निवडून ‘व्हॅलेंटाईन’ सप्ताहातील पहिला ‘रोझ डे’ साजरा केला.
लाल गुलाबाला जास्त मागणी
बीडमध्ये रविवारी बाजारपेठेत लाल गुलाबाला अधिक मागणी असल्याचे दिसून आले. दुपारपर्यंत कोणीच फुल विक्रेत्यांकडे फिरकले नव्हते. मात्र, दुपारनंतर तरूणाईने गुलाब खरेदीला गर्दी केली. लाल गुलाबच सर्वात जास्त विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
मनात चिडीमारची भीती...!
आपल्या आवडत्या व्यक्तीला फुल देताना तरूणाईच्या मनात भीती असल्याचे दिसून आले. परंतु आपल्या ‘प्रीय’ व्यक्तिला फुल देऊन पे्रमाचा ‘इजहार’ करण्याची संधी तरूणाईने सोडली नाही.
पांढरा गुलाब - आपल्या आयुष्यात कोणीतरी येणार असा संदेश देतो. या रंगाचे गुलाबाचे फुल वडील आपल्या मुलीस आणि मुले आपल्या आईला देतात. हा रंग निर्मळ पे्रमाचे प्रतीक मानला जातो.
४लाल गुलाब - लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे. हे ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ हा संदेश गुलाब देतो. हा रंग प्रेमाचा रंग मानला जातो. या रंगाचे गुलाब देऊन प्रियकर-प्रेयसी एकमेकांवरील प्रेम प्रकट करतात.
४पिवळा गुलाब - माझ्याशी मैत्री करशील काय? हे जणू हा गुलाब विचारतो. हा गुलाब मैत्रीचे संकेत देतो. यात आनंद सामावलेला असतो. हे फुल देणे म्हणजे तु माझा जिवलग होतास, होतीस आणि कायमस्वरूपी राहशील. अनोळखी व्यक्तीला हा गुलाब दिलात तर ही मैत्रीची सुरूवात मानली जाते.
४गुलाबी गुलाब - हा रंग प्रतिष्ठेचे प्रतिनिधीत्व करतो. एखाद्या व्यक्तिचा स्वभाव आवडत असेल तर त्याला हा गुलाब दिला जातो. तु मला आवडतोस, आवडतेस हा संकेत हे गुलाब देते.