समुद्रातील दुर्मीळ प्रवाळ बेटांचे होणार संरक्षण
By admin | Published: March 6, 2015 12:12 AM2015-03-06T00:12:15+5:302015-03-06T00:12:40+5:30
सागरी पर्यटनाला फायदा : संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांतर्गत उपक्रम
संदीप बोडवे ल्ल मालवण
सिंधुदुर्गातील सागरी प्रवाळ क्षेत्रांचे रक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमांंतर्गत महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे समुद्रात असलेल्या दुर्मीळ प्रवाळ बेटांचे संरक्षण केले जाणार आहे.
ज्या ठिकाणी समुद्रात प्रवाळ बेटे नाहीत, परंतु त्यासाठी पोषक स्थिती आहे, अशा ठिकाणी ‘आर्टिफिशल रिफ’ व ‘कोरल ट्रान्सलोकेशन’ अर्थात कृत्रिम प्रवाळ बेटांवर प्रवाळांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. यासाठी सिंधुदुर्गच्या समुद्रात झुलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाकडून प्रवाळ क्षेत्रांचा अभ्यास सुरू झाला आहे.
या अभ्यासातून येणाऱ्या निष्कर्षानंतर स्थानिकांच्या सहमतीने कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यानंतर निवडलेल्या क्षेत्रावर तमिळनाडूच्या सुगंधी देवदासन मरिन रिसर्च इन्स्टिट्यूटमार्फत प्रवाळ बेटे तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. युएनडीपीच्या या उपक्रमामुळे सिंधुदुर्गातील दुर्मीळ प्रवाळ बेटांचे संवर्धन तर होणार आहेच, परंतु सागरी पर्यटनासही मोठा फायदा होणार आहे.
१३ प्रकारच्या दुर्मीळ प्रवाळांच्या प्रजाती
सिंधुदुर्ग किल्ल्यानजीक मरिन पार्कच्या कोअर झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवाळ बेटे आढळतात. याखेरीज तारकर्ली, वायरी, चिवला बीच, राजकोट या भागांतही काही प्रमाणात प्रवाळ बेटे आहेत. सिंधुदुर्गात टर्बिनिरिया मेसेन्टेरिना, पोरायटीज ल्युटीया, कॉसिनिरीया मॉनिलिज, सायफेस्ट्रिया मायक्रोथेरमा, सिफॅन, ब्लॅक व फायर आदी १३ प्रकारच्या दुर्मीळ प्रवाळांच्या प्रजाती आढळून येतात.
१) युएनडीपीअंतर्गत उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात झुआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाकडून प्रवाळ बेटांवर होणारे तापमान वाढ, मानवी हस्तक्षेप, सागरी प्रदूषण यांचे परिणाम तपासण्यात येणार आहेत. तसेच सिंधुदुर्गात अन्य कोणकोणत्या ठिकाणी प्रवाळ बेटांच्या वाढीसाठी पोषक स्थिती आहे याचाही अभ्यास करण्यात येणार आहे.
२) प्रवाळ बेटांच्या अभ्यासानंतर आर्टीफिशल रिफ व कोरल ट्रान्सलोकेशन करण्यासाठी मत्स्य विभाग, जिल्हा प्रशासन, मेरीटाईम बोर्ड, स्नॉर्कलिंग गाईड, पारंपरिक मच्छिमार आदींचे प्रतिनिधी असलेली एक समिती स्थापन करण्यात येईल.
३) स्थानिक समितीच्या सहमतीने प्रवाळ बेटांच्या रक्षण व संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यात प्रवाळ बेटांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी धोरण आखण्यात येणार आहे. तसेच वेंगुर्ला, देवगड व मालवणच्या समुद्रात सुगंधी देवदासन मरीन रिसर्च इन्स्टिट्यूटमार्फत कृत्रिम प्रवाळ बेटे तयार करून या बेटांवर जिवंत प्रवाळांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.
४) नुकतेच झुलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाच्या डॉ. वासुदेव त्रिपाठी, डॉ. सी. एच. सत्यनारायण, डॉ. राजकुमार राजन, आदी वरिष्ठ संशोधकांच्या पथकाने मालवणच्या समुद्रात डायव्हिंग करून प्राथमिक माहिती जमा केली आहे.
५) सिंधुदुर्गला देवगड, मालवण व वेंगुर्ला या तीन सागरी तालुक्यांचा मिळून १२१ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, मालवणच्या समुद्रात फक्त प्रवाळ बेटे आढळून येतात. या प्रवाळ बेटांमुळे मालवणमध्ये स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंग, आदी प्रकारच्या सागरी पर्यटन व्यवसायात वाढ झाली आहे.
६) युएनडीपीच्या कृत्रिम प्रवाळ बेटांवर प्रवाळांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उपक्रमामुळे वेंगुर्ला, देवगड, विजयदुर्ग, आचरा आदी ठिकाणच्या समुद्रातही प्रवाळ बेटे तयार होणार आहेत. यामुळे या भागातही स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंग व्यवसायाला संधी मिळणार आहे.
समुद्रातील दुर्मीळ प्रवाळ बेटांचे होणार संरक्षण
(पान १ वरून) फायर आदी १३ प्रकारच्या दुर्मीळ प्रवाळांच्या प्रजाती आढळून येतात.
१) युएनडीपीअंतर्गत उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात झुआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाकडून प्रवाळ बेटांवर होणारे तापमान वाढ, मानवी हस्तक्षेप, सागरी प्रदूषण यांचे परिणाम तपासण्यात येणार आहेत. तसेच सिंधुदुर्गात अन्य कोणकोणत्या ठिकाणी प्रवाळ बेटांच्या वाढीसाठी पोषक स्थिती आहे याचाही अभ्यास करण्यात येणार आहे.
२) प्रवाळ बेटांच्या अभ्यासानंतर आर्टीफिशल रिफ व कोरल ट्रान्सलोकेशन करण्यासाठी मत्स्य विभाग, जिल्हा प्रशासन, मेरीटाईम बोर्ड, स्नॉर्कलिंग गाईड, पारंपरिक मच्छिमार आदींचे प्रतिनिधी असलेली एक समिती स्थापन करण्यात येईल.
३) स्थानिक समितीच्या सहमतीने प्रवाळ बेटांच्या रक्षण व संवर्धनासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. यात प्रवाळ बेटांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी धोरण आखण्यात येणार आहे. तसेच याच समितीच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला, देवगड व मालवणच्या समुद्रात सुगंधी देवदासन मरीन रिसर्च इन्स्टिट्यूटमार्फत कृत्रिम प्रवाळ बेटे तयार करून या बेटांवर जिवंत प्रवाळांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.
४) नुकतेच झुलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाच्या डॉ. वासुदेव त्रिपाठी, डॉ. सी. एच. सत्यनारायण, डॉ. राजकुमार राजन, आदी वरिष्ठ संशोधकांच्या पथकाने मालवणच्या समुद्रात डायव्हिंग करून प्राथमिक माहिती जमा केली आहे.
५) सिंधुदुर्गला देवगड, मालवण व वेंगुर्ला या तीन सागरी तालुक्यांचा मिळून १२१ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, मालवणच्या समुद्रात फक्त प्रवाळ बेटे आढळून