आचरा येथील डाळपस्वारीचा शाही थाट

By admin | Published: April 15, 2015 09:42 PM2015-04-15T21:42:07+5:302015-04-15T23:57:33+5:30

शेकडो भाविकांची उपस्थिती : ‘काळकाय’ देवीचे आश्वासक अभिवचन

The royal palace of the dalapaswari of Achira | आचरा येथील डाळपस्वारीचा शाही थाट

आचरा येथील डाळपस्वारीचा शाही थाट

Next

आचरा : आचरा गावच्या रयतेची सुखदु:खे जाणण्यासाठी आठ दिवस डाळपस्वारीनिमित्त बाहेर पडलेली श्री देव रामेश्वराची स्वारी मंगळवारी रात्री उशिरा रामेश्वर मंदिराला प्रदक्षिणा घालून पारंपरिक कर्तव्ये पार पाडत गांगेश्वर मंदिरात विसावली. शेकडो भाविकांच्या साथीने आणि केवळ तीन वर्षांनी बोलणाऱ्या ‘काळकाय’ देवीच्या आश्वासक अभिवचनात या डाळपस्वारीची सांगता झाली.दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मंगळवारी सकाळी डाळपस्वारीच्या फेरीला सुरुवात झाली. गिरावळी मंदिरातून आचरा बाजारपेठेत आगमन झालेल्या ‘श्रीं’च्या स्वारीचे स्वागत बाजारपेठवासीय, रिक्षा संघटनांनी जल्लोषात फटाक्यांच्या आतषबाजीत केले. फुरसाई मंदिरमार्गे संपूर्ण बाजारपेठेतून दुपारी श्रींच्या स्वारीचे आचरा तिठा येथे आगमन झाले.
संध्याकाळी नागोचीवाडी ब्राह्मणदेव येथे भाविकांची गाऱ्हाणी, ओट्या स्वीकारत आगमन झाले. येथील डाळप पूर्ण करत काही काळ विसावली. संध्याकाळी उशिरा येथून माळावरील पारंपरिक वाटेने पारवाडी ब्राह्मणदेव मंदिराकडे आली.
यावेळी ‘श्रीं’च्या स्वारीचे आणि सोबत आलेल्या शेकडो भाविकांचे पारवाडी ब्राह्मणदेव मंडळातर्फे जल्लोषात स्वागत केले. डाळप पूर्ण करून काही काळ ब्राह्मणदेव मंदिरात स्वारी विसावली. नंतर ‘श्रीं’ची स्वारी भाविकांची गाऱ्हाणी ऐकत रात्री उशिरा मृदंगाच्या तालावर रामेश्वर मंदिराकडे परतली. यावेळी भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.अफाट जनसागराला सोबत घेत वाद्यांच्या गजरात ललकारीने रामेश्वर मंदिराला पावलांच्या साथीने प्रदक्षिणा घालत गांगेश्वर मंदिराकडे विसावली. मंगळवारी बाजारपेठेत तसेच रिक्षा संघटना यांच्याकडून भाविकांना अल्पोपहाराची व जेवणाची व्यवस्था केली. तसेच रात्री पारवाडीत ब्राह्मणदेव पारवाडी मित्रमंडळाकडून सर्व भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. तसेच संजय घाडी मित्रमंडळातर्फे अल्पोपहार देण्यात आला. पहाटे डाळपस्वारी उत्सव संपला आणि देव रामेश्वराची रयत तृप्त मनाने आपल्या घरी परतली. (वार्ताहर)

Web Title: The royal palace of the dalapaswari of Achira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.