सिंधुदुर्गचे ग्रामीण जीवन सामाजिक स्वरूपात सर्वासमोर; 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

By अनंत खं.जाधव | Published: December 22, 2022 11:35 PM2022-12-22T23:35:50+5:302022-12-22T23:36:24+5:30

प्रविण बांदेकर यांनी सावंतवाडी येथे राहूनच आपले साहित्य राष्ट्रीय स्तरावर पोचवले आहे.

Rural life of Sindhudurg in social form Bahuliy of the right trunk in front of everyone; Web Title: Sahitya Akademi Award announced for novel 'Ujvya Sondeche Bahulya' | सिंधुदुर्गचे ग्रामीण जीवन सामाजिक स्वरूपात सर्वासमोर; 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्गचे ग्रामीण जीवन सामाजिक स्वरूपात सर्वासमोर; 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

googlenewsNext

सावंतवाडी : लेखक प्रविण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या पुस्तकाला राष्ट्रीय स्तरावरील साहित्य आकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आणि यामुळे सिंधुदुर्ग चे नाव साहित्य क्षेत्रात देशपातळीवर पोचले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहून साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवत असतना साहित्य आकादमीचा पुरस्कार घेणारे बांदेकर ऐकमेव लेखक आहेत.या पुरस्कार प्राप्त पुस्तकातून त्यांनी सिंधुदुर्ग चे ग्रामीण जीवन सामाजिक स्वरूपात मांडले असून राष्ट्रीय स्तरावर ते विशेष भावल्याचे दिसून आले.

प्रविण बांदेकर यांनी सावंतवाडी येथे राहूनच आपले साहित्य राष्ट्रीय स्तरावर पोचवले आहे. त्याच्या लिखाणात नेहमी  सामाजिक, राजकीय व पर्यावरण याचा नेहमी सर्दभ असतो उजव्या सोंडेच्या बाहुल्या या पुस्तकातून ही त्यांनी सिंधुदुर्ग वासियाचे ग्रामीण जीवन सामाजिक स्वरूपात माडण्याचे काम केले आहे. साधारणता बांदेकर यांनी 2014 मध्ये हे पुस्तक लिहायला घेतले आणि 2016 मध्ये पुस्तक लिहून संपले आणि ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस याच्या हस्ते सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर येथे प्रकाशनही केले त्यानंतर आज तब्बल सहा वर्षांनी या पुस्तकाला सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे.त्याचा त्यांना विशेष आनंद आहे.

बांदेकर यांनी या पुस्तकातून सिंधुदुर्ग वासियाचे ग्रामीण जीवन उलगडत असतना कळसुत्री बाहुल्या प्रमाणे येथील राजकारणी लोकांना कसे नाचवतात हे या पुस्तकातून माडण्याचा प्रयत्न केला आहे. कारण सामाजिक राजकीय आणि पर्यावरण हे तीनीही विषय त्यांनी या पुस्तकातून अधोरेखित करत पुढे आणले आहेत आणि हाच विषय परिक्षकाना विशेष भावल्याचे दिसून येत आहे.कारण ग्रामीण जीवन हा या पुस्तकाचा खऱ्या अर्थाने गाभा असल्याचे उजव्या सोंडेच्या बाहुल्या या पुस्तकातून दिसून आले.

बांदेकर यांना साहित्य क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळाले पण हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना सावंतवाडीच्या मातीत राहून येथेच लेखन करून मिळाल्याने त्याचा त्यांना विशेष आनंद आहे. साहित्य आकादमी चा पुरस्कार यापूर्वी कविवर्य मंगेश पाडगावकर तसेच लेखक आरती प्रभू सतिश काळसेकर आदिना मिळाले पण हे सर्व लेखक सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असले तरी त्याचे कार्यक्षेत्र मुंबई होते.पण बांदेकर यांनी सावंतवाडीत राहूनच या सर्वोच्च पुरस्काराला गवसणी घातली आहे.हे विशेष मानले जाते.

हा मला सुखद धक्काच: बांदेकर 

पुरस्कार मिळाल्यानंतर लेखक प्रविण बांदेकर यांनी लोकमत शी संवाद साधताना हा मला सुखद धक्काच आहे.चार वाजता दिल्लीतून फोन आला आणि मला पुरस्कार जाहीर झाल्याचे समजले माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वाचे आभार मानतो असे बांदेकर यांनी सांगितले.

Web Title: Rural life of Sindhudurg in social form Bahuliy of the right trunk in front of everyone; Web Title: Sahitya Akademi Award announced for novel 'Ujvya Sondeche Bahulya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.