sindhudurg news: भरधाव डंपरने ५ महिलांना उडवले, एक ठार; मोलमजुरी करून निघाल्या होत्या घरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 01:11 PM2023-02-10T13:11:42+5:302023-02-10T13:13:27+5:30

काळसे होबळीचा माळ येथे झाला भीषण अपघात 

Rushing dumper blows up 5 women, one killed; Fatal accident at Kalse Hobli Mal sindhudurg district | sindhudurg news: भरधाव डंपरने ५ महिलांना उडवले, एक ठार; मोलमजुरी करून निघाल्या होत्या घरी

sindhudurg news: भरधाव डंपरने ५ महिलांना उडवले, एक ठार; मोलमजुरी करून निघाल्या होत्या घरी

googlenewsNext

चौके : काळसे होबळीचा माळ येथे मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने जाणारा चंदगड येथील डंपर क्र. (एमएम ४६ एफ ०८२७) ने मोलमजुरी करून घरी जाणाऱ्या पाच महिलांना मागून जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सवा सहाच्या सुमारास घडली. या अपघातात काळसे रमाईनगर येथील रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (६५) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

या भीषण अपघातात रुक्मिणी विठोबा काळसेकर (५५ ), अनिता चंद्रकांत काळसेकर (५५ ), प्रमिला सुभाष काळसेकर (४०), प्रज्ञा दीपक काळसेकर (३५) या चौघी जणी जखमी झाल्या आहेत. जखमी महिला रुग्णांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिसांनी मद्यधुंद चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

या अपघाताची माहिती मिळताच काळसे गावातील रहिवासी पोलिस उपिनिरीक्षक नितीन कदम आणि पोलिस पाटील विनायक प्रभू, राजेंद्र परब, अण्णा गुराम, प्रमोद काळसेकर यांच्या सह ग्रामस्थ घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यानंतर नितीन कदम यांनी मालवण पोलिस स्थानकात दूरध्वनीवरून अपघाताची माहिती दिली आणि १०८ रुग्णवाहिका बोलावून उपस्थितांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक विजय यादव, पोलिस उपनिरीक्षक झांजुर्णे यांच्यासह सुहास पांचाळ, राजन पाटील, सुहास शिवगण यांच्यासह अन्य पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
 

Web Title: Rushing dumper blows up 5 women, one killed; Fatal accident at Kalse Hobli Mal sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.