एस. टी. कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करू : नीतेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 05:10 PM2017-10-11T17:10:27+5:302017-10-11T17:13:54+5:30

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्या पदाधिकाºयांनी आमदार नीतेश राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी मागण्यांबाबत आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी इंटकच्या पदाधिकाºयांना दिले.

S. T. Follow up on the demands of employees: Nitesh Rane | एस. टी. कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करू : नीतेश राणे

एस. टी. कर्मचाºयांच्या मागण्यांबाबत पाठपुरावा करू : नीतेश राणे

Next
ठळक मुद्देइंटकच्या पदाधिकाºयांना आश्वासनआमदार नीतेश राणे यांची भेट घेऊन पदाधिकाºयांनी दिले निवेदन

कणकवली,11 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्या पदाधिकाºयांनी आमदार नीतेश राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी मागण्यांबाबत आपण पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार नीतेश राणे यांनी इंटकच्या पदाधिकाºयांना दिले.


महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी एस. टी. कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग मिळावा या मागणीसाठी दिलेले निवेदन घेऊन इंटकचे सिंधुदुर्ग विभागाचे अध्यक्ष अशोक राणे, सचिव एच. बी. रावराणे, प्रसिध्दीप्रमुख सुधीर सावंत, गणेश शिरकर, रंजन प्रभू, डी. एस. कदम यांनी आमदार नीतेश राणे यांची भेट घेतली व आपल्या मागण्यांबाबत यांच्याशी चर्चा केली.


गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यांतील परिवहन महामंडळांच्या कर्मचाºयांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाºयांच्या पगारापेक्षा जास्त वेतन आहे, मग महाराष्ट्र परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना कमी वेतन का, याबाबत आपण पाठपुरावा करावा व एस. टी.कर्मचाºयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी इंटकच्या पदाधिकाºयांनी आमदार नीतेश राणे यांच्याकडे केली.


महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाºयांना मिळणारा अपुरा पगार, प्रचंड वाढती महागाई, गृह कर्ज, वैद्यकीय खर्च, पाल्यांचे शैक्षणिक खर्च, मुलांचे विवाह आदींसाठी वाढत जाणारा खर्च यामुळे कर्मचारी बेजार झाले असून काही कर्मचाºयांनी आत्महत्याही केल्या आहेत. एस. टी. कर्मचाºयांची स्थिती अतिशय हलाखीची असून कर्मचाºयांच्या आर्थिक स्थितीबाबत पदाधिकाºयांनी नीतेश राणे यांच्याशी चर्चा केली.


कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग मिळवून देण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन नीतेश राणे यांनी शिष्टमंडळाला दिले.

Web Title: S. T. Follow up on the demands of employees: Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.