एस. टी. कामगार संघटनेला खिंंडार
By Admin | Published: January 25, 2016 12:55 AM2016-01-25T00:55:49+5:302016-01-25T01:02:29+5:30
कार्यकर्ते इंटकमध्ये
सावंतवाडी : महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस तथा इंटक संघटनेचे राज्याध्यक्ष आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडीतील एस. टी. कामगार संघटनेचे माजी सचिव अरूण गवस यांच्यासह सुमारे दीडशे कार्यकर्त्यांनी इंटक संघटनेत प्रवेश केला. यामुळे सावंतवाडी एस. टी. कामगार संघटनेला मोठे खिंंडार पडले आहे.
येथील मातृछाया मंगल कार्यालयात झालेल्या इंटकच्या मेळाव्यात हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी इंटकचे विभागीय सचिव एच. बी. रावराणे, सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष अशोक राणे, कार्याध्यक्ष कृष्णा राणे, खजिनदार आशिष काणेकर, डेपो अध्यक्ष अरूण सरदेसाई, सचिव रावजी राणे, माजी उपाध्यक्ष बी. जे. तुळसकर, भाई राणे, कणकवली आगाराचे अध्यक्ष गणेश गिरकर, सुधीर सावंत, हेमंत इंगळे, आनंद शिरसाट, किरण पाटील, बी. डी. राऊळ, लियाकत शेख उपस्थित होते. दरम्यान, मागील महिन्यात इंटकच्यावतीने छेडण्यात आलेल्या आंदोलनावेळी राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एस. टी. कामगारांना २५ टक्के पगारवाढ देण्याची ग्वाही दिली होती. ३१ मार्चपर्यंत ही पगारवाढ न मिळाल्यास संघटनेच्यावतीने संप पुकारण्यात येईल, असा इशारा यावेळी छाजेड यांनी दिला होता. प्रवेशकर्त्यांमध्ये सी. व्ही. सोनुर्लेकर, शाम हळदणकर, एस. टी. प्र्रभू, ए. पी. कदम, संतोष राणे, सी. ए. तेंडोलकर, आर. ए. आडके, सुरेश धुरी, एस. एस. जरग, एस. आर. ललित, डी. आर. गवस, एस. ए. भगत, टी. एम. पवार, आर. जे. झोरे, एन. पी. धुरी, जे. व्ही. कदम, बी. बी. खरूडे, बापू राऊळ, आर. एस. मोरे, ए. आर. नाईक, एम. पी. गवस, प्रवीण नाईक, के. एम. सावंत, एस. जी. ताटे, डी. एस. मसुरकर आदींचा समावेश आहे. (वार्ताहर)