सचिन गावकरचे कुडाळात आगमन

By admin | Published: January 16, 2015 09:01 PM2015-01-16T21:01:55+5:302015-01-16T23:47:12+5:30

सायकलवरून भारतभ्रमण : मानसिक आरोग्याचा देतोय संदेश

Sachin Gaonkar's arrival in the Koodal | सचिन गावकरचे कुडाळात आगमन

सचिन गावकरचे कुडाळात आगमन

Next

कुडाळ : ‘मानसिक आरोग्य सर्वांसाठी’ हा उद्देश जोपासून इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) या संघटनेचे सचिन गावकर यांनी भारत परिभ्रमणास सायकलवरून सुरुवात केली. काल, गुरुवारी त्यांचे कुडाळात आगमन झाले. २२३ दिवसांत १४ हजार किलोमीटरचा प्रवास २५ राज्यांतून करणार आहेत.‘मानसिक आरोग्य सर्वांसाठी’ हा उद्देश जोपासून आयपीएच ही संस्था गेली पंचवीस वर्षे कार्यरत आहे. मानसिक आरोग्याची गरज आहे का? ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी हा सायकल भ्रमणमधून जनजागृतीचा हेतू आहे. आज गावकर यांनी कुडाळ येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ. रुपेश धुरी, डॉ. मंदार कालेकर आदी उपस्थित होते. गावकर म्हणाले की, ठाणे येथे जे हॉस्पिटल आहे ते मेंटल हॉस्पिटल म्हणून परिचित होते. गेली २५ वर्षे डॉ. आनंद नाडकर्णी व त्यांच्या टीमने या ठिकाणी काम करून चित्र बदलले. गेली दहा वर्षे मी संस्थेचा सभासद आहे. संपूर्ण भारतात मानसिक संकल्पना काय आहे? याचा आढावा घेत त्यावर ४० मिनिटांची डॉक्युमेंटरी बनविणे, शाळा कॉलेजमध्ये तरुणांपर्यंत या उपक्रमाची माहिती पोहोचावी हा हेतू जोपासून सायकलभ्रमण सफारीला सुरुवात केली.
१४ हजार किलोमीटर
सायकलभ्रमण करताना २५ राज्यांतून १४ हजार कि.मी. प्रवास करताना हा प्रवास २२३ दिवसांत पूर्ण करणार आहे. ७ जानेवारीला ठाणे येथून प्रवासाला सुरुवात झाली.
आज कुडाळात आगमन झाले. या प्रवासात पुणे येथील मुक्तांगणला भेट, सातारा येथे एमएसडब्ल्यू कॉलेजच्या मुलांशी संवाद, अंनिसचे संपादक नरेंद्र दाभोलकर यांच्या परिवर्तन केंद्रास भेट.
सांगली येथे डॉक्टर तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा आदींतून सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. माझा प्रवास विचारांना चालना देणारा आहे.

प्रवासाचे टप्पे
ठाणे ते कन्याकुमारी १७६३ किमी २२ दिवस ५ राज्ये
कन्याकुमारी ते कलकत्ता २४४० किमी ३६ दिवस ३ राज्ये
कोलकाता ते बडोदरा ३४३० किमी ७२ दिवस ८ राज्ये
बडोदरा ते मनाली २०६९ किमी ३१ दिवस ६ राज्ये
मनाली ते जम्मू ११८७ किमी २७ दिवस १ राज्य
जम्मू ते ठाणे २८४९ किमी ३६ दिवस २ राज्ये असे आहेत. आतापर्यंत ८५०० किमी अनुभव आल्याचे सांगितले.

सचिन गावकर यांनी याअगोदरही जनहितार्थ उपक्रमाच्यादृष्टीने ७ हजार ५०० किलोमीटरचे अंतर सायकल सफारीने पार केले असून आता मानसिक आरोग्य सर्वांसाठी हा संदेश देशात पसरावा या उद्देशाने संपूर्ण देशभर सायकल सफर सुरुवात केली आहे.
- डॉ. रुपेश धुरी, मानसोपचारतज्ज्ञ, कुडाळ

Web Title: Sachin Gaonkar's arrival in the Koodal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.