सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूरसंचार अडचणींचे त्वरीत निराकरण व्हावे :सुरेश प्रभू
By admin | Published: July 13, 2017 03:45 PM2017-07-13T15:45:22+5:302017-07-13T15:45:22+5:30
केंद्रीय दूरसंचार मंत्र्याना दिले सविस्तर पत्र
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी दि. १३ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार खंडीत होणारी दूरसंचार सेवा सुधारावी व आवश्यक तो कर्मचारी वर्ग तातडीने भरावा असे पत्र केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांना दिले आहे. सेवा अधिक चांगली व्हावी यासाठी नैशनल आॅप्टीकल फायबर नेटवर्क सारखे पर्याय करावे असेही त्यांनी सूचित केले आहे. या बाबत केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय दूरसंचार राज्य मंत्री मनोज जिन्हा यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अडचणी सविस्तर पत्राद्वारे विशद केल्या आहेत.
सिंधुदुर्गात वादळी वारे अथवा तत्सम नैसर्गिक आपत्ती आल्यावर लगेचच दूरसंचारचे नेटवर्क खंडीत होते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच स्तरातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती पाहिली असता येथे कायमस्वरुपी पर्याय निर्माण करणे आवश्यक आहे. यामध्ये नॅशनल आॅप्टीकल फायबर नेटवर्क व बेस ट्रान्सीवर स्टेशन यासारख्या तांत्रिक सुधारणा प्राधान्याने पूर्ण कराव्यात. तसेच कर्मचा-यांची रिक्त पदे भरावीत अशा सूचनाही त्यांनी या पत्राद्वारे केल्या आहेत.
सिंधुदुगार्तील दुर्गम भागातील शेवटच्या इसमापर्यंत दूरसंचारच्या सेवा मिळाव्यात अशी अपेक्षाही त्यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे.