सिंधुदुर्ग : कणकवली विधानसभा मतदार संघावर भगवा फडकवा : वैभव नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 01:43 PM2018-11-12T13:43:38+5:302018-11-12T13:47:23+5:30
कणकवली मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराला गेल्या निवडणुकीत जरी कमी मते पडली असली तरी आता शिवसेनेची ताकद वाढत आहे. कुडाळ व सावंतवाडी मतदार संघात ज्याप्रमाणे शिवसेनेचा भगवा फडकला त्याच प्रमाणे कणकवली मतदार संघावर आपल्याला भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी आता सज्ज व्हा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी येथे केले.
कणकवली : कणकवली मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवाराला गेल्या निवडणुकीत जरी कमी मते पडली असली तरी आता शिवसेनेची ताकद वाढत आहे. कुडाळ व सावंतवाडी मतदार संघात ज्याप्रमाणे शिवसेनेचा भगवा फडकला त्याच प्रमाणे कणकवली मतदार संघावर आपल्याला भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी आता सज्ज व्हा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी येथे केले.
कणकवली- देवगड- वैभववाडी -विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत विजय भवन येथे झाली.
या बैठकीत तिन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची रिक्त पदे, नवीन पदाधिकारी नियुक्त्या, संघटना वाढीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी वैभव नाईक यांनी मार्गदर्शन करताना पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले.
अरुण दुधवडकर म्हणाले, पक्ष संघटना वाढीसाठी विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, बूथ प्रमुख यांनी गावागावात जोमाने काम केले पाहिजे. कणकवली मतदार संघात आपल्याला विजय मिळवायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आतापासूनच कामाला लागा.
प्रत्येकाने पक्षाशी प्रामाणिक राहून जास्तीत जास्त नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करा. जुन्या नव्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करा. शिवसेनेवर लोकांचा विश्वास आहे. याच विश्वासाच्या जोरावर आपल्याला विजय संपादन करण्यासाठी लढायचे आहे असेही ते म्हणाले.
यावेळी उपजिल्हा प्रमुख राजू शेटये, विधानसभा संघटक सचिन सावंत , तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद गावडे, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, देवगड तालुका प्रमुख मिलींद साटम, प्रसाद करंदीकर, देवगड उपसभापती संजय देवरुखकर, राजू राठोड , महिला आघाडी प्रमुख नीलम पालव- सावंत, विलास साळसकर,डॉ प्रवीण सावंत, अमेय जठार, स्वप्नील धुरी, योगेश मुंज,सुजित जाधव, मीनल तळगावकर, भालचंद्र दळवी आदि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.