ओटवणेतील साहिलची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 21:01 IST2023-12-12T21:00:50+5:302023-12-12T21:01:11+5:30
साहिल हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे या प्रकारामुळे त्यांच्यावर दुःखाचा पहाडच कोसळला आहे.

ओटवणेतील साहिलची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट
: एकुलता एक मुलगा
सावंतवाडी : तालुक्यातील ओटवणे कापईवाडी येथील साहिल सदगुरु केळुसकर (२२) या युवकाने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली.मंगळवारी सायंकाळी सात च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
साहिल यांचे वडिल मोलमंजुरी करतात त्यांना साहिल हा एकुलता एक मुलगा होता त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मंगळवारी साहिल चे वडिल नेहमीप्रमाणे मोलमजूरी करण्याकरीता गेले होते. तर आई सावंतवाडी येथे बाजाराला गेली होती. याच वेळी घरी कोणी नसल्याची संधी साधून त्याने घरात गळफास लावून घेतला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह खाली उतरविला असून पंचनामा सुरु केला आहे.
साहिल हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे या प्रकारामुळे त्यांच्यावर दुःखाचा पहाडच कोसळला आहे. साहिल हा हसतमुख व खेळकर स्वभावाचा होता. मात्र, त्याने अशा प्रकारे आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला असावा याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस तपास सुरू असून आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.मात्र या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे.