'साहित्य सहवास' संस्थेचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर, 'लोकमत'च्या महेश सरनाईकांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 09:49 AM2019-05-04T09:49:44+5:302019-05-04T09:54:14+5:30

साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी 'साहित्य सहवास' ही संस्था यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे.

'Sahitya Sahavas' organization's journalism award, honor of Lokmat's Mahesh Sarnaik | 'साहित्य सहवास' संस्थेचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर, 'लोकमत'च्या महेश सरनाईकांचा सन्मान

'साहित्य सहवास' संस्थेचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर, 'लोकमत'च्या महेश सरनाईकांचा सन्मान

googlenewsNext

मालवण : साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी 'साहित्य सहवास' ही संस्था यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्या पार्श्वभूमीवर या संस्थेकडून अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्यात आला आहे. या संस्थेतर्फे साहित्य, पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. कोकणात उत्तुंग कार्य केलेल्या पत्रकारांना या संस्थेनं पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे.

लोकमत सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक यांना कै. श्रीकांत देसाई स्मृती जिल्हास्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. तर ग्रामीण विभाग आदर्श पत्रकारिता पुरस्कार लोकमतचे मालवण प्रतिनिधी सिद्धेश आचरेकर यांना मिळाला आहे. कै. चंद्रकांत भोगटे स्मृती राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार TV9 मराठीच्या ऋषी देसाई यांना जाहीर झाला आहे. उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार महेंद्र पारकर यांना देण्यात आला आहे. कै. यशवंतराव बांदेकर आदर्श पत्रकारिता पुरस्कारा (वृत्तपत्र विभाग)नं दै. प्रहारचे प्रतिनिधी कुणाल मांजरेकरांना सन्मानित करण्यात आलं आहे.

तर कै. यशवंतराव बांदेकर आदर्श पत्रकारिता पुरस्कारा (इलेक्ट्रॉनिक मीडिया विभाग)नं सिंधुदुर्ग लाइव्हच्या कृष्णा ढोलम यांना गौरविण्यात आलं आहे. पुण्यनगरीचे अमित खोत, पुढारीचे मंगेश नलावडे, तरुण भारतचे परेश सावंत यांनाही 'साहित्य सहवास' या संस्थेकडून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.  यंदा संस्थेचा रौप्य महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा 1 जून 2019 रोजी मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे संपन्न होणार आहे. या संस्थेच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रासाठी देण्यात येणारे पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक विजय कोदे यांनी जाहीर केले आहेत. 

Web Title: 'Sahitya Sahavas' organization's journalism award, honor of Lokmat's Mahesh Sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.