माकडताप गोचिड चावल्यानेच
By Admin | Published: February 4, 2016 01:30 AM2016-02-04T01:30:27+5:302016-02-04T01:30:27+5:30
एस. के. किरण : शिमोग्यातील पथकाची केर येथे पाहणी
दोडामार्ग : माकडताप हा कॅसनूर फॉरेस्ट डिसीज अर्थात के.एफ.डी. या विषाणूमुळे होतो. मात्र, हा ताप माकडांपासून कधीच होत नाही. गोचिड चावल्याने या तापाचा प्रादुर्भाव होतो, असे प्रतिपादन शिमोगा (कर्नाटक) येथून केर येथे दाखल झालेले वैद्यकीय पथकातील प्रमुख तथा कर्नाटक व्हायरस डायनोटिक सेंंटरचे क्षेत्रिय अधिकारी डॉ. एस. के. किरण यांनी केले.
ते म्हणाले, माकडतापापासून बरे होण्यासाठी आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे औषध किंवा इंजेक्शन नाही. मात्र, योग्य ती काळजी घेतल्यास त्यापासून बरे होता येते. त्यामुळे मुळात आजार होऊ नये, यासाठी उपाययोजना राबविण्यातच शहाणपण आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड हे तालुक्याचे ठिकाण व त्या लगतची जामसंडे ग्रामपंचायत यांचे एकत्रीकरण करून नगरपंचायत स्थापावी, अशी मागणी २००५ पासूनची आहे. या दोन्ही ग्रामपंचायतींची लोकसंख्या सुमारे १७ ते १८ हजारांच्या घरात असून, या ठिकाणी अधिकारी डॉ. एस. के. किरण यांनी केले.
तालुक्यातील केर गावात माकडतापाची साथ आल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात झालेल्या कर्नाटक राज्यातील शिमोगा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी केर गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माकडतापासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या सोबत कर्नाटक राज्याचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सी. डी. वीरभद्रा, मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. संध्या, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती आत्माराम पालयेकर, हिवताप विभागाच्या जिल्हा अधिकारी डॉ. आश्विनी जंगम, डॉ. नामदेव सोडल, दोडामार्ग तालुुका वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार चिपळूणकर, जिल्हा परिषद सदस्य एकनाथ नाडकर्णी, भरत जाधव, केर सरपंच प्रेमानंद देसाई, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नगरपंचायती लवकरच अस्तित्वात
अंतिम अधिसूचना निघाल्यानंतर देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम निवडणूक विभागाकडून टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहे.
ही नगरपंचायत झाल्यास तेथील विकासकामांना चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्गनगरी या नगरपंचायतीलाही शासनाची मान्यता मिळाली असून, या नगरपंचायतीचे पुढील प्रशासकीय कामकाज सुरू झाले आहे.
नगरपंचायतीतील प्रारूप सूचना जाहीर करून यावर हरकतीनंतर ही नगरपंचायतही लवकरच अस्तित्वात येईल, असे समजते.
गोचिडांचा नायनाट आवश्यक
हा आजार आटोक्यात आणण्यासाठी मुळात उपाययोजना राबविण्याची गरज आहे. गोचिडांचा नायनाट होणे आवश्यक आहे. जवळपास डिसेंबर ते मे महिन्यापर्यंत या गोचिडांना पोषक वातावरण असते. या काळात तयार होणाऱ्या ‘निम्फ’ या गोचिडांपासून हा व्हायरस होतो आणि हा आजार होतो. त्यामुळे गोचिडांपासून संरक्षण करण्यासाठी जंगलात अथवा शेतात जाताना शरीराच्या मोकळ्या भागाला एम.पी.डी. आॅईल लावून जावे, ज्यामुळे गोचिडी लागत नाहीत, असेही यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात आले.