साक्षी पिंगुळकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम, बारावी निकाल : कुडाळ कॉलेजची विद्यार्थिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 03:32 PM2018-05-31T15:32:27+5:302018-05-31T15:32:27+5:30
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन जाहीर झाला. कुडाळ कॉलेजच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी साक्षी पिंगुळकर हिने ९५.२३ टक्के गुण मिळवित जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
सिंधुदुर्ग : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन जाहीर झाला. कुडाळ कॉलेजच्या विज्ञान शाखेची विद्यार्थिनी साक्षी पिंगुळकर हिने ९५.२३ टक्के गुण मिळवित जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूलच्या विज्ञान शाखेच्या प्रणिता राऊळ हिने ९४.१५ टक्के गुण मिळवित द्वितीय व कुडाळ हायस्कूलच्या वाणिज्य शाखेच्या मृणाल सरवटे (९३.३८) हिने तृतीय क्रमांक मिळविला.
कणकवली कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या जुही वालावलकर हिने (९३.२३ टक्के) प्राप्त करीत चतुर्थ तर सावंतवाडीतील पंचम खेमराज महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेची तनया वाडकर हिने (९३.०७) पाचवा क्रमांक पटकाविला.
बुधवारी दुपारी १ वाजल्यानंतर शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी विविध ठिकाणच्या सायबर कॅफेमध्ये गर्दी केली होती. तर अनेक विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोनच्या आधारे आपला निकाल पाहिला.
बारावीच्या निकालाची धागधूग अखेर संपली असून आता दहावीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने आपल्या यशाचा झेंडा कायम ठेवल्याने त्याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे.