Sindhudurg: कुत्र्यांच्या हल्यात सांबर जखमी
By अनंत खं.जाधव | Published: September 20, 2023 01:39 PM2023-09-20T13:39:16+5:302023-09-20T13:40:30+5:30
सावंतवाडी : कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे माजगाव येथे सांबर जखमी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. त्या जखमी सांबरा बाबत ...
सावंतवाडी : कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे माजगाव येथे सांबर जखमी झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. त्या जखमी सांबरा बाबत सावंतवाडी वनविभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी सांबराला सुखरूपपणे नैसर्गिक अधिवासात सोडले.
ही घटना मंगळवारी सायंकाळची असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. परिसरात असलेल्या कुत्र्यांनी या सांबरावर जोरदार हल्ला केला होता. यात हे सांबर पूर्णता जखमी झाले. त्याच्या गळ्याभोवती मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे ते अत्यवस्थ स्थितीत होते.
याबाबतची माहिती तेथील युवा कार्यकर्ते सचिन मोरजकर यांनी वनविभागाला दिली. त्यानंतर सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल मदन क्षिरसागर, वनरक्षक प्रमोद राणे व वनपाल महादेव गेजगे यांनी मिळून त्याची नैसर्गिक अधिवासात रवानगी केली. सध्या नरेंद्र डोंगरावरून गवे तसेच डुक्कर हे मानवी वस्तीत पाण्यासाठी येतात. हे सांबर देखील पाण्याच्या शोधात आले असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली.