संभाजी भिडे अचानक दोडामार्गमध्ये, देव पिंपळेश्वराचं घेतलं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 04:40 PM2023-08-24T16:40:06+5:302023-08-24T16:41:17+5:30
गोव्यात एका नियोजित कार्यक्रमासाठी संभाजी भिडे जात असतना होते भिडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग शहरातील पिंपळेश्वर चौकात थांबले होते.
दोडामार्ग : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुवारी अचानक दोडामार्ग शहरात दाखल झाले.त्यांनी येथील श्री देव पिंपळेश्वरचे दर्शन घेतले. भिडे यांना बघून अनेकजण अवाक झाले मात्र यावेळी दोडामार्ग तालुक्यातील उपस्थित धारकऱ्यांनी तसेच हिंदू बांधवांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
गोव्यात एका नियोजित कार्यक्रमासाठी संभाजी भिडे जात असतना होते भिडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग शहरातील पिंपळेश्वर चौकात थांबले होते.यावेळी त्यांचे धारक ऱ्यांनी जंगी स्वागत केले मां जिजाऊ माता, छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर श्री संभाजी महाराज, यांच्या जोरदार घोषणा दिल्या.
भिडे श्री देव पिंपळेश्वरचे दर्शन घेत एक प्रदक्षिणाही काढली. भिडे यांना भेटण्यासाठी तालुक्यातील धारकरी आले होते. आपल्या धारकऱ्यांना भेटून चर्चा केल्यानंतर भिडे गोव्याकडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील, तालुकाध्यक्ष प्रकाश गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, बांधकाम सभापती नितीन मणेरिकर, भारत माता की जय संघटनेचे गणेश गावडे, यांसह शैलेश दळवी, रंगनाथ गवस, समीर रेडकर, आदी उपस्थित होते.