आडनाव सारखं असलं म्हणून घाणेरडे बोलले पाहिजे असे नाही, दीपक केसरकर यांची विनायक राऊत यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 03:41 PM2024-05-04T15:41:07+5:302024-05-04T15:42:27+5:30
'ताटामध्ये घाण करायची तुम्हाला सवय असेल आम्हाला नाही'
वेंगुर्ला : काहीतरी येऊन भाषण करायचे, काहीतरी शिवराळ भाषेत बोलायचं याला कोकण म्हणत नाहीत आणि ही शिवराळ भाषा कदाचित एका राऊतांकडून दुसरे राऊत शिकले असतील, असे मला वाटते. आडनाव सारखं असलं म्हणून तसं घाणेरडे बोललं पाहिजे असं नाही. ताटामध्ये घाण करायची तुम्हाला सवय असेल आम्हाला नाही, अशी टीका दीपक केसरकर यांनी विनायक राऊत यांच्यावर केली.
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शालेय शिक्षणमंत्र्यांनी वेंगुर्ला शहरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी केसरकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केसरकर म्हणाले, पर्यटनाच्या दृष्टीने पुढे येणारा काळ हा वेंगुर्ला तालुक्याचा असणार आहे. ही निवडणूक विकासाची लढाई आहे.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप गिरप, शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, शहरप्रमुख उमेश येरम, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर, युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, भाजपा युवा मोर्चा तालुकाप्रमुख प्रणव वायंगणकर आदी उपस्थित होते.