पारकर यांच्या कृतीतून सरकार अपयशी ठरल्याचे स्पष्ट, समीर नलावडे यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:09 PM2019-05-16T12:09:46+5:302019-05-16T12:12:28+5:30

गेल्या काही दिवसात संदेश पारकर आणि त्यांचे सहकारी शासकीय रुग्णालय, वीज वितरण कार्यालय, महामार्ग कार्यालय , पोलीस स्टेशन व अन्य काही विभागांमध्ये जाऊन सरकार अपयशी ठरल्याचाच पुरावा एकप्रकारे त्यांच्यासमोर देत आहेत . रुग्णालयातील रिक्त पदांबाबत आम्हीही अनेकदा आवाज उठवला होता . मात्र, संदेश पारकर यांच्या या कृतीतून भाजप-शिवसेनेचे सरकार गेल्या साडेचार वर्षात खऱ्या अर्थाने अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत असल्याचा टोला नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला.

Sameer Nalawade blames government for failure of Parker's action | पारकर यांच्या कृतीतून सरकार अपयशी ठरल्याचे स्पष्ट, समीर नलावडे यांचा टोला

पारकर यांच्या कृतीतून सरकार अपयशी ठरल्याचे स्पष्ट, समीर नलावडे यांचा टोला

Next
ठळक मुद्देपारकर यांच्या कृतीतून सरकार अपयशी ठरल्याचे स्पष्ट, समीर नलावडे यांचा टोलारुग्णालयातील रिक्त पदांबाबत आवाज

कणकवली : गेल्या काही दिवसात संदेश पारकर आणि त्यांचे सहकारी शासकीय रुग्णालय, वीज वितरण कार्यालय, महामार्ग कार्यालय , पोलीस स्टेशन व अन्य काही विभागांमध्ये जाऊन सरकार अपयशी ठरल्याचाच पुरावा एकप्रकारे त्यांच्यासमोर देत आहेत . रुग्णालयातील रिक्त पदांबाबत आम्हीही अनेकदा आवाज उठवला होता . मात्र, संदेश पारकर यांच्या या कृतीतून भाजप-शिवसेनेचे सरकार गेल्या साडेचार वर्षात खऱ्या अर्थाने अपयशी ठरल्याचे स्पष्ट होत असल्याचा टोला नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी लगावला.

कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्ष दालनात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी बांधकाम सभापती अभिजीत मुसळे , गटनेते संजय कामतेकर , किशोर राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी समीर नलावडे म्हणाले, कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे संदेश पारकर यांनी येत्या सहा महिन्यात 100% भरावीत. आम्ही त्यांचा जाहीर सत्कार करू . परंतु राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे अपयशी ठरल्याचा दाखला संदेश पारकर यांनी दिल्याबद्दल नगरपंचायतच्यावतीने त्यांचे अभिनंदन करतो.

वीज वितरण मध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचा पुरावा कार्यकारी अभियंत्यांना भेट घेऊन त्यांनी सादर केला . या कृतीतून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले आहे . त्याचप्रमाणे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कारभार करण्यास कुचकामी ठरत असल्याचे या वेगवेगळ्या प्रश्नांवर दिसत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

ते पुढे म्हणाले, पारकर यांच्या या सरकारविरोधी भूमिकेविषयी भाजपाची भूमिका कोणती आहे ? ते पहिल्यांदा भाजपा जिल्हाध्यक्षांनी जाहीर करावे . साडेचार वर्षात सरकार अपयशी ठरल्याचे पारकर दाखवून देत आहेत . त्यामुळे शिवसेना भाजपच्या नेत्यांनी आपली भूमिका जाहीर करावी. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत पारकरांचा पराभव झाल्यामुळे आता पत्रकबाजी करून आपण कार्यरत असल्याचे दाखविण्याचा प्रकार संदेश पारकर करत आहेत . हिंमत असेल तर त्यांनी सत्तेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मार्गी लावावेत. लोकांसमोर नौटंकी करून दिशाभूल करू नये. असा टोला समीर नलावडे यांनी लगावला आहे.

कणकवली भूमिगत वीज वाहिन्या बाबत निर्णय घ्यायला आम्ही सत्ताधारी म्हणून सक्षम आहोत . कणकवलीचा नगराध्यक्ष या नात्याने मी आणि मुख्याधिकारी भूमिगत वीज वाहिनी प्रकल्प यशस्वीपणे राबविणार आहोत .यापूर्वी पारकर यांचे पंधरा नगरसेवक असायचे. मात्र, आता त्यांच्या हातात तीनच नगरसेवक आहेत त्यामुळे लोकांनी नाकारलेल्या पारकर यांना कणकवली शहराबद्दल बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही . आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संदेश पारकर फक्त नौटंकी करत असल्याचा आरोप समीर नलावडे यांनी यावेळी केला.

Web Title: Sameer Nalawade blames government for failure of Parker's action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.