नगराध्यक्षपदी समिता कुडाळकर बिनविरोध: भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:25 PM2020-07-04T17:25:11+5:302020-07-04T17:29:23+5:30
वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी समिता संतोष कुडाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीची घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
वैभववाडी : वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी समिता संतोष कुडाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीची घोषणा होताच भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
अक्षता जैतापकर यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार बुधवारी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दिवशी निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे कुडाळकर यांचा एकच अर्ज दाखल झाल्यामुळे कुडाळकर यांची निवड निश्चित झाली होती. प्रांताधिकारी राजमाने यांनी शुक्रवारी नगराध्यक्षपदी कुडाळकर यांच्या निवडीची घोषणा केली. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
त्यानंतर भाजपाचे तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, मधुसूदन बांदिवडेकर, भालचंद्र साठे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, बांधकाम सभापती संतोष पवार, शिक्षण व आरोग्य सभापती सुचित्रा कदम, नगरसेवक रवींद्र रावराणे, संजय चव्हाण, संतोष माईणकर, स्वप्नील ईस्वलकर, सज्जन रावराणे, दीपा गजोबार, शोभा लसणे, संपदा राणे, रवींद्र तांबे, हुसेन लांजेकर उपस्थित होते.
कुडाळकर शहराच्या पाचव्या नगराध्यक्ष!
वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचा हा पहिलाच पंचवार्षिक कालावधी आहे. या काळात पहिल्या अडीच वर्षात रवींद्र रावराणे आणि त्यानंतर संजय चव्हाण यांनी नगराध्यक्ष पद भूषविले. नंतरच्या अडीच वर्षांच्या काळात जवळपास दीड वर्ष दीपा गजोबार, त्यानंतर सहा महिने अक्षता जैतापकर आणि आता समिता कुडाळकर यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे पहिल्याच पंचवार्षिकमध्ये कुडाळकर या पाचव्या नगराध्यक्ष ठरल्या आहेत. नगरपंचायतीची मुदत नोव्हेंबरमध्ये संपणार आहे.