नाबार्ड योजनेअंतर्गत तीन पुलांच्या कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 06:10 PM2020-12-22T18:10:04+5:302020-12-22T18:11:07+5:30
Vaibhav Naik News- नाबार्ड योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षासाठी कुडाळ तालुक्यातील मांडकुली- तेर्सेबांबर्डे मार्गावरील मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ४ कोटी ५४ लाख, मालवण तालुक्यातील कट्टा एसटी स्टँड ते गुरामवाडी मार्गावरील लहान पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी २८ लाख तर गुरामवाड कुंभारवाडी मार्गावरील लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी ५१ लाख २७ हजार रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
मालवण : नाबार्ड योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षासाठी कुडाळ तालुक्यातील मांडकुली- तेर्सेबांबर्डे मार्गावरील मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ४ कोटी ५४ लाख, मालवण तालुक्यातील कट्टा एसटी स्टँड ते गुरामवाडी मार्गावरील लहान पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी २८ लाख तर गुरामवाड कुंभारवाडी मार्गावरील लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी ५१ लाख २७ हजार रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
गेली अनेक वर्षे ही पुले बांधण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांची मागणी होत होती. याबाबत आमदार वैभव नाईक यांच्याकडे शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आमदार नाईक यांनी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
या पुलांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. या पुलांमुळे अनेक गाव, वाड्या जोडल्या जाणार असून नागरिकांना सोयीचे होणार आहे. याबाबत स्थानिक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार नाईक यांचे आभार मानले आहेत.