वाळू उपशाला ग्रामस्थांचा विरोध, कर्ली नदी खाडीपात्रातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 11:39 AM2019-01-25T11:39:27+5:302019-01-25T11:44:42+5:30

मालवण तालुक्यात आंबेरी वाकवाडी येथील कोळवण ते आंबेरी ह्या लिलाव प्रक्रियेमधील वाळू गट क्रमांक -ई-३ या संपूर्ण गटास तसेच वाळू गट क्रमांक -ई-२ च्या काही भागास येथील स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे.

Sandal Upashree opposes villagers, curly river creek depot | वाळू उपशाला ग्रामस्थांचा विरोध, कर्ली नदी खाडीपात्रातील स्थिती

वाळू उपशाला ग्रामस्थांचा विरोध, कर्ली नदी खाडीपात्रातील स्थिती

Next
ठळक मुद्देवाळू उपशाला ग्रामस्थांचा विरोध, कर्ली नदी खाडीपात्रातील स्थिती परिसरातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

चौके : मालवण तालुक्यात आंबेरी वाकवाडी येथील कोळवण ते आंबेरी ह्या लिलाव प्रक्रियेमधील वाळू गट क्रमांक -ई-३ या संपूर्ण गटास तसेच वाळू गट क्रमांक -ई-२ च्या काही भागास येथील स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे.

या वाळूउपशा गटासमोरील भागात या शेतकऱ्यांचे शेतीचे ठिकाण वाक्कर जुवा बेट असून या बेटावर मोठ्या प्रमाणावर शेतजमीन आहे. दुबार भातशेती केली जाते तसेच नदीकीनारी माडबागायत मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेती -नांगरणी करता नदीतून शेतकऱ्यांची होडीने तसेच बैलांची (जनावरांची) ये-जा सुरू असते. त्यामुळे वाळू काढताना वापरण्यात येणारे वाळूचे नांगर व त्याला बांधलेली २०० फूट दोरी टाकलेली असते.

शेतीसाठी गुरांना पाण्यातून पोहत नदीपलीकडील या बेटावर जावे लागते जनावरे पोहत असताना दोरी पायाला अडकून त्यांच्या जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो त्यांच्याबरोबर शेतकरी आपल्या कुटुंबासोबत होड्यातून ये जा करीत असतात त्यांना पण धोका निर्माण होऊ शकतो या शेतीवर व माडबागायतीवर या शेतक?्याचा उदारनिर्वाह चालतो.

अन्य उपजीविका पर्याय नाही यामुळेच येथील शेतकऱ्यांनी ग्रामस्थानी एकत्र येत सदर वाळू गटास वाळू उपसा होऊ नये म्हणून शासन दरबारी जोरदार हरकत घेतली आहे. यापूर्वी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात (खनिकर्म विभाग ) येथे रितसर लेखी तक्रारी केलेल्या आहेत.

२६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा

आंबेरी-वाक शेत जमीन जुवा बेटा समोरील आंबेरी वाक येथील वाळू गट क्र.ए-3 व वाळू गट क्र.ए-2 चा काही भागासमोर हे शेतीचे बेट आसल्याने या ठिकाणचा वाळू उपशा रद्द न झाल्यास २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा पार्श्वभूमीवर उपोषणास बसण्याचा व त्यानंतर हि न्याय न मिळाल्यास सामुदायिक आत्मदहनाचा इशारा शेतकरी ग्रामस्थ यांनी दिला आहे.

Web Title: Sandal Upashree opposes villagers, curly river creek depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.