कर्नाटक मधील चंदन तस्कर दोडामार्ग मधून ताब्यात, कर्नाटक पोलिसाची कारवाई
By अनंत खं.जाधव | Published: March 22, 2023 10:20 PM2023-03-22T22:20:02+5:302023-03-22T22:20:12+5:30
चंदन तस्करी प्रकरणात संशयित म्हणून हव्या असलेल्या फरार आरोपीला शनिवारी मध्यरात्री कर्नाटक पोलिसांनी दोडामार्ग येथून ताब्यात घेतले
सावंतवाडी :
चंदन तस्करी प्रकरणात संशयित म्हणून हव्या असलेल्या फरार आरोपीला शनिवारी मध्यरात्री कर्नाटक पोलिसांनी दोडामार्ग येथून ताब्यात घेतले आहे.आंनद मारुती रामणनवर (२९ ) असे त्याचे नाव असून तो बिदरभावी (ता.खानापूर) येथील रहिवासी आहे.
दोडामार्ग मध्ये तो सेन्ट्रीग कामगार म्हणून एका परप्रांतीय ठेकेदाराकडे गेल्या दोन महिन्यांपासून तो काम करत आहेत. या कारवाई बाबत स्थानिक पोलीस मात्र अनभिज्ञ असून याबाबतची कोणतीही माहिती नसल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
कर्नाटक राज्यातील नंदगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा गुन्हा दाखल असून हा युवक चंदन तस्करी प्रकरणी पोलिसांना हवा होता. तो दोडामार्ग तालुक्यात राहत असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक बसवराज लमाणी यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक एच. श्रीनिवासन , एन.बी .बेळवडी ,एन.एम.मुल्ला ,यू.बी शिंत्री यांच्या पथकाने दोडामार्ग -गोवा राज्याच्या सीमेवर भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या आनंद रामणनवर याला शनिवारी रात्री ११ वाजण्या च्या सुमारास सापळा रचून मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस तपासात त्याच्याकडे पाच किलो चंदनही पोलिसांनी जप्त केले आहे.