संदीप डाकवे यांची विलासराव देशमुख यांना अनोखी आदरांजली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 06:53 PM2021-05-26T18:53:00+5:302021-05-26T18:58:58+5:30

culture Sindhudurg : राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या 26 मे रोजीच्या 76 व्या जयंतीनिमित्त स्क्रिबलिंग मधून त्यांचे चित्र रेखाटून त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्वविक्रमवीर चित्रकार डॉ.संदीप डाकवे यांनी हे चित्र तयार केले असून या चित्राचे परिसरातून कौतुक होत आहे. 

Sandeep Dakve pays homage to Vilasrao Deshmukh | संदीप डाकवे यांची विलासराव देशमुख यांना अनोखी आदरांजली 

संदीप डाकवे यांची विलासराव देशमुख यांना अनोखी आदरांजली 

Next
ठळक मुद्दे डॉ.संदीप डाकवे यांची विलासराव देशमुख यांना अनोखी आदरांजली शब्दातून चित्रे काढणारा अवलिया चित्रकार

निकेत पावसकर 

सिंधुदुर्ग : राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या 26 मे रोजीच्या 76 व्या जयंतीनिमित्त स्क्रिबलिंग मधून त्यांचे चित्र रेखाटून त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्वविक्रमवीर चित्रकार डॉ.संदीप डाकवे यांनी हे चित्र तयार केले असून या चित्राचे परिसरातून कौतुक होत आहे. 


सातारा जिल्हयातील डाकेवाडी-काळगांव ता.पाटण येथील विश्वविक्रमवीर चित्रकार डॉ. संदीप डाकवे आपल्या जादुई चित्रकलेच्या माध्यमातून शब्दांची गुंफण करत शब्दातून विविध चित्रे साकारत आहेत. आतापर्यंत त्यांनी संत गाडगेबाबा, गौतम बुध्द, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.पाटील (आबा), अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ खाडीलकर, रा.गो.प्रभुणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, खा.श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अभिनेते भरत जाधव इ.सह अनेकांची शब्दचित्रे रेखाटली आहेत.

डॉ.संदीप डाकवे यांनी शब्दचित्राबरोबर खडूतून अष्टविनायक, मोरपीस-जाळीदार पिंपळपानावर कलाकृती, अक्षरगणेशा, व्यंगचित्रे, पोस्टर रेखाटन, पेपर कटींग आर्ट, रांगोळी, पुस्तकांची मुखपृष्ठे, कॅलिग्राफी, छत्रीवर व्यसनमुक्ती संदेश इ.कलात्मक उपक्रम राबवले आहेत. तसेच 7000 हून अधिक विविध क्षेत्रातील दिग्गजांना त्यांची हुबेहुब चित्रे काढत सरप्राईज भेटी दिली आहेत. त्यांच्या या छंदाची नोंद ह्यइंडिया बुक आॅफ रेकॉर्डह्ण, या पुस्तकात दोनदा तरहायरेंज बुक आॅफ वल्र्ड रेकॉर्ड मध्ये एकदा झाली आहे.

डॉ.डाकवे यांना चित्रकलेबरोबरच लेखनाचा छंद असून त्यांची 4 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तर 6 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांनी पत्रकारिता, चित्रकारिता, लेखन, साहित्य यात आपले वेगळेपण सिध्द केले आहे. त्यामुळे त्यांचा शासन दरबारी 4 वेळा तर विविध संस्थांनी सुमारे 50 हून अधिक पुरस्कार देवून गौरवले आहे.

केवळ चित्रे न रेखाटता यामधून मिळालेल्या मानधनातून नाम फाऊंडेशन 35 हजार, केरळ पुरग्रस्तांना 21 हजार, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला 5 हजार, माजी सैनिक हणमंतराव पाटील 5 हजार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी 7 हजार, ईशिता पाचुपते 5 हजार,  शैक्षणिक फीसाठी 6 हजार, भारत के वीर या खात्यात 1 हजार अशी सुमारे 85 हजाराची मदत केली आहे.याशिवाय सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी स्थापन केलेल्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट मधून सुमारे लाख रुपयाचे शैक्षणिक साहित्य वितरित केले आहे.

कोविड 19 च्या वाढत्या प्रार्दुभावामुळे देशमुख कुटूंबियांकडून सामुदायिक आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांनी आहे त्या ठिकाणी राहूनच आपल्या नेत्याला आदरांजली अर्पण करावी असे आवाहन देशमुख कुटूंबियांकडून केले होते. त्या अनुषंगाने डॉ.डाकवे यांनी स्क्रिबलिंग मधून देशमुख यांचे अप्रतिम चित्र रेखाटले आहे. त्याचे परिसरातून कौतुक होत आहे. 

Web Title: Sandeep Dakve pays homage to Vilasrao Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.