कणकवली विधानसभा मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार संदेश पारकर यांची संपत्ती ९ कोटी ५५ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 05:47 PM2024-10-30T17:47:15+5:302024-10-30T17:48:48+5:30
कणकवली : महाविकास आघाडीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदेश भास्कर पारकर यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची ...
कणकवली: महाविकास आघाडीचे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदेश भास्कर पारकर यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची तसेच पत्नी व मुलांची मिळून एकूण संपत्ती ९ कोटी ५५ लाख, ७४ हजार ९२१ रुपये एवढी आहे. तर पारकर व पत्नीच्या नावे बँका व पतसंस्थांचे मिळून १ कोटी ५७ लाख ९१ हजार ७०९ रुपये एवढे कर्ज आहे.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात संदेश पारकर यांचे ९ लाख ७० हजार ४२० रुपये आणि पत्नी समृद्धी यांचे ११ लाख ३८० रुपये एवढे करपात्र उत्पन्न आहे. संदेश पारकर यांच्याकडे दीड लाख, पत्नीकडे २ लाख तर मुलगा सौरभ याच्याकडे ५० हजार व मुलगी गांधर्वी हीच्याकडे २५ हजार रुपये रोख रक्कम आहे.
संदेश पारकर यांच्याकडे ५० ग्रॅम, पत्नीकडे २०० ग्रॅम सोने तसेच पारकर व पत्नी व मुलांकडे मिळून तीन दुचाकी, एक फॉर्च्यूनर, एक इनोव्हा, एक डंपर, दोन आयवा, एक जेसीबी, एक डीमॅक्स टेम्पो तसेच एलआसी, शेअर्स आरडी अशी मिळून २ कोटी ३९ लाख ६८ हजार ३२१ रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
तर स्वसंपादित व वारसाहक्क मिळून कणकवलीसह शिवडाव, करंजे येथे जमीन, गोवा, कोल्हापूर येथे घर अशाप्रकारे मिळून ७ कोटी १६ लाख ६ हजार एवढी स्थावर मालमत्ता आहे. पारकर यांच्या नावे ८८ लाख २५ हजार ९१४ रुपयांचे तर पत्नीच्या नावे ६९ लाख ६५ हजार ७९५ रुपयांचे कर्ज आहे. तर पारकर यांच्यावर ५ फौजदारी गुन्हे प्रलंबित आहेत,असे उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.