सांगली जिल्हा विजेता
By admin | Published: April 19, 2015 10:12 PM2015-04-19T22:12:42+5:302015-04-20T00:12:29+5:30
ड्रॉप रो बॉल स्पर्धा : सिंधुदुर्ग दुसऱ्या स्थानी
सांगली : आक्रमकता आणि वेगाचे गणित जमवत अनुभवी सांगली जिल्हा संघाने प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवून राज्यस्तरीय ड्रॉप रो बॉल स्पर्धेत विजेतेपद पटकावले. सिंधुदुर्गला दुसऱ्या, तर कोल्हापूर जिल्ह्यास तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले.
बांबवडे (ता. पलूस) येथील गुरुकुल आविष्कार शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडली. राज्यभरातील तीनशेपेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. उद्घाटन जितेंद्र संकपाळ यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरद लाड यांच्या हस्ते झाले. नामदेव शिंदे यांनी स्वागत केले. यावेळी जी. ए. कॉलेजचे युआर शुभम जाधव, उद्योजक भाग्योदय डोंबे, शशिकांत पाटील, जयवंत पवार, दीपक पाटील, विजय मोहिते, राहुल पाटील, सुधीर आदाटे उपस्थित होते.
स्पर्धेचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय अंतिम निकाल असा : सबज्युनिअर गट : मुले : सिंगल : प्रतीक फोटे (कोल्हापूर), अवधूत साळुंखे (सांगली), सिद्धेश शिर्के (सिंधुदुर्ग). मुली : साक्षी पाटील (सिंधुदुर्ग), आकांक्षा पाटील (सांगली), प्रज्ञा दाभाडे (सातारा). डबल प्रकार : ऋषिकेश पवार व कुणाल रावळ (सांगली), कुणाल लाड व साहील जाधव (रत्नागिरी), आदित्य घाटगे व प्रशांत पाटील (सिंधुदुर्ग). मुली : प्रज्ञा दाभाडे व काजल दाभाडे (सातारा), आकांक्षा पाटील व शिवाणी पाटील (सांगली), कोमल माने व साक्षी पाटील (सातारा). ट्रीपल प्रकार : अवधूत साळुंखे, प्रज्ज्वल काळे व शेखर शेटे (सांगली).
सीनिअर गट मुले : सिंगल : इम्रान शेख, हेमंत शिर्के, तुषार पाटील. डबल : विकास वायकर व जमीर शेख (अहमदनगर), शुभम गवळी व स्वप्निल जगताप (कोल्हापूर), कुंडलिक कुंपी व मेहबूब शेख (सातारा). ट्रीपल : ज्ञानेश्वर शिंदे, करण पाटील व करण नायकवडी (सांगली), किरण लेंडवे, विजय फाटे व सागर लेंगरे (सोलापूर), अक्षय सोनवणे, लिनेश लकडे व रोहित सोनवणे (जळगाव).
पंच म्हणून धनेश म्हस्के, एस. दत्ता व संदीप लंबे यांनी काम पाहिले. राष्ट्रीय स्पर्धा भोपाळ (मध्य प्रदेश) येथे होणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)