सारंग कुलकर्णी यांची ‘सी-वर्ल्ड’मधून माघार

By admin | Published: October 19, 2015 10:44 PM2015-10-19T22:44:24+5:302015-10-19T23:46:33+5:30

एजन्सीने मानधन थकविल्यानेच निर्णय

Sarang Kulkarni withdraws from 'Sea World' | सारंग कुलकर्णी यांची ‘सी-वर्ल्ड’मधून माघार

सारंग कुलकर्णी यांची ‘सी-वर्ल्ड’मधून माघार

Next

मालवण : राज्य शासन आणि एमटीडीसी यांच्याबरोबर काम करत आपण आजपर्यंत मांडलेल्या स्कुबा डायव्हींग सेंटर, सी - वर्ल्ड, आंग्रीया बँक या सर्व प्रकल्पांना सहकार्य मिळाले आहे. यातूनच सी - वर्ल्डसारखा आंतरराष्ट्रीय दजार्चा प्रकल्प साकारण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासाठी स्वत:हून लक्ष देऊन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी अडचणीचा ठरत असलेला जमिनीचा मुद्दाही सोडवला आहे. ज्याची निर्मिती आणि प्रकल्प प्रमुख म्हणून काम केले, त्या सी-वर्ल्डसंबंधित आपले मानधन सायन्स व टेक्नॉलॉजी पार्क या एजन्सीने थकवल्यानेच इच्छा नसतानाही या प्रकल्पातून आपण माघार घेतली आहे, असे आंतरराष्ट्रीय सागरतज्ज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी यांनी सांगितले.
सी - वर्ल्डचे निर्मातेच प्रकल्पात नसल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असल्याबद्दल डॉ. कुलकर्णी यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर स्कुबा डायव्हींग सेंटर पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. लवकरच विविध प्रशिक्षण कार्यक्रम त्यामध्ये घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्य शासनाने सी-वर्ल्ड प्रकल्पासाठी नेमलेल्या पुणे येथील सायन्स व टेक्नॉलॉजी पार्क या संस्थेने दीड वर्ष आपले मानधन थकवल्यानेच सी - वर्ल्ड प्रकल्पापासून आपण फारकत घेतली आहे. हा निर्णय घेताना नक्कीच दु:ख झाले. प्रकल्पाचा आराखडा, सर्वांच्या संमत्तीसाठी घेतलेली मेहनत आणि प्रसंगी केलेली पदरमोड यामुळे आपण कर्जबाजारी होण्याची भीती निर्माण झाली होती. शासनाच्या एजन्सीकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागल्याचेही डॉ. कुलकर्णी म्हणाले. (प्रतिनिधी)


प्रकल्पांकडे लक्ष देणार
सारंग कुलकर्णी प्रकल्पात नाहीत. त्यामुळे सध्या कार्यरत असणारी संस्था हा प्रकल्प कशाप्रकारे पूर्ण करते, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. एमटीडीसीकडे वेळोवेळी मांडलेल्या संकल्पनेला शासनाने प्रोत्साहन दिल्यामुळे मालवणात आणि जिल्ह््यात पर्यटनाची व्याप्ती वाढलेली आहे. सध्या हा व्यवसाय १५ कोटींची उलाढाल करणारा ठरला आहे. आता आपण आंग्रीया बँक आणि स्कुबा डायव्हींग प्रकल्पांकडे लक्ष देणार आहोत. राज्य आणि केंद्र शासन या दोन्ही प्रकल्पांसाठी चांगले वातावरण निर्माण करत असल्याने लवकरच पर्यटनाला वेगळी दिशा मिळणार असल्याचा विश्वास डॉ. सांगर यांनी व्यक्त केला.

Web Title: Sarang Kulkarni withdraws from 'Sea World'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.