अँटीनावाले कासव पोहोचले लक्षद्वीप समुद्रात, दुसऱ्या कासवाचा वेग मंदावला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 03:42 PM2023-06-15T15:42:15+5:302023-06-15T15:42:26+5:30

हा प्रकल्प कासवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्‍यासाठी

Satellite tagged turtles reach Lakshadweep sea | अँटीनावाले कासव पोहोचले लक्षद्वीप समुद्रात, दुसऱ्या कासवाचा वेग मंदावला

अँटीनावाले कासव पोहोचले लक्षद्वीप समुद्रात, दुसऱ्या कासवाचा वेग मंदावला

googlenewsNext

संदीप बोडवे

मालवण: कासव संवर्धन मोहिमेतील दुसऱ्या टप्प्यात सॅटेलाईट टॅगींग केलेल्या दोन कासवांपैकी बागेश्री हे कासव केरळ किनारा ओलांडून अजून पुढे दक्षिणेकडे लक्षद्वीप समुद्राकडे वळले आहे. तर गुहा हे कासव कर्नाटक किनारपट्टी भागात मागील महिनाभरापासून तिथेच रेंगाळले आहे.

मॅंग्रोव्ह फाउंडेशन, महाराष्ट्र वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्था (WII) यांच्या रत्नागिरी विभागाच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रत्नागिरीतील गुहागर समुद्रकिनाऱ्यावर आणखी दोन ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रहाद्वारे टॅग करण्यात आले. दोन्ही मादी असलेल्या या कासवांना बागेश्री आणि गुहा अशी नावे देण्यात आली आहेत.

हा प्रकल्प कासवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्‍यासाठी आणि घरटे बनवण्‍याच्‍या साइटवर जाण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या प्रवासाचा मागोवा घेण्‍यासाठी मागील वर्षी सुरू केलेल्या संशोधन कार्यक्रमाचा भाग आहे. गेल्या वर्षी पाच मादी कासवांना जोडलेले ट्रान्समीटर गहाळ झाले, यामुळे मॅंग्रोव्ह फाउंडेशन आणि डब्ल्यू आय आय ने यंदा या दोन कासवांना सॅटेलाइट टॅग केले आहे.

दुसऱ्या कासवाचा वेग मंदावला

  • सॅटेलाईट टॅगींग केलेल्या दोन कसवांपैकी बागेश्री केरळ किनारा ओलांडून अजून पुढे दक्षिणेकडे वळली आहे. ती तिथल्या महाद्वीपीय शेल्फ पाण्यात गेली आहे. बागेश्री सातत्याने मार्गक्रमण करताना दिसत आहे. लवकरच ती अरबी समुद्र मागे सोडून लक्षद्वीप समुद्रात प्रवेश करेल. 
  • तर दुसरीकडे गुहा त्याच भागात कायम आहे. गुहा कर्नाटक किनारपट्टीच्या खोल पाण्यात शिरली आहेत आणि हळूहळू दक्षिणेकडे जात आहे. मात्र तिचा मार्गक्रमण करण्याचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्या पासून गुहा त्याच भागात रेंगाळत आहे. 

Web Title: Satellite tagged turtles reach Lakshadweep sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.