कणकवलीत जातीचे दाखले मिळाल्याने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 08:00 PM2020-10-27T20:00:17+5:302020-10-27T20:02:01+5:30

Kankavli, muncipaltyCarporation, sindhdurugnews नलावडे व हर्णे यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे त्याबाबत पाठपुरावा केला होता. या समाजाला येणाऱ्या अडचणी लक्षात घेत प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने ४० जणांचे दाखले दिले आहेत. त्यामुळे त्या समाजबांधवांनी समधान व्यक्त केले.

Satisfaction with Kankavali caste certificates | कणकवलीत जातीचे दाखले मिळाल्याने समाधान

कणकवली नगरपंचायत कार्यालयात सोमवारी मांग-गारुडी समाजाच्या लोकांना नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या हस्ते जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

googlenewsNext
ठळक मुद्देमांग-गारूडी समाजाने मानले आभार नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांच्या प्रयत्नांना यश

कणकवली : कणकवली शहरातील मांग-गारूडी समाजाच्या अनेक लोकांना जातीच्या दाखल्याअभावी शासकीय योजनांचा लाभ मिळत नव्हता. याबाबत या समाजाच्या लोकांनी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे नलावडे व हर्णे यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे त्याबाबत पाठपुरावा केला होता. या समाजाला येणाऱ्या अडचणी लक्षात घेत प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने ४० जणांचे दाखले दिले आहेत. त्यामुळे त्या समाजबांधवांनी समधान व्यक्त केले.

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या हस्ते नगरपंचायत कार्यालयात सोमवारी हे दाखले वितरीत करण्यात आले. गेली अनेक वर्षे या समाजाला जातीचे दाखले मिळत नसल्याने त्यांची ससेहेलपट होत होती .

आता दाखले मिळाल्याने आमचा अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. यासाठी आमच्या समाजाच्यावतीने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, प्रांताधिकारी यांचे आम्ही आभार मानतो, असे यावेळी रमेश गायकवाड, किशोर चौगुले, विष्णू सकट, संदीप चौगुले, बिरबल चौगुले, आकाश सकट आदींनी सांगितले. यावेळी मांग-गारूडी समाजबांधव उपस्थित होेते.

Web Title: Satisfaction with Kankavali caste certificates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.