काँग्रेसची सत्त्वपरीक्षा

By Admin | Published: November 29, 2015 12:57 AM2015-11-29T00:57:43+5:302015-11-29T00:57:43+5:30

सावंतवाडी पंचायत समिती : शौचालय घोटाळ्यामुळे अडचणीत

Sattva Examination of Congress | काँग्रेसची सत्त्वपरीक्षा

काँग्रेसची सत्त्वपरीक्षा

googlenewsNext

सावंतवाडी : वेर्लेतील शौचालय घोटाळयाचा अहवाल सोमवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत मांडण्यात येणार असल्याने सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. आधीच चार सदस्याच्या निलंबामुळे सत्ताधारी कॉंग्रेस अल्पमतात आलेली असताना या अहवालामुळे विरोधी पक्ष काँग्रेसवर कसा आक्रमण करतो आणि त्याला काँग्रेस कसे प्रतिउत्तर देणार, याची परीक्षाच पाहायला मिळणार आहे.
वेर्ले येथे शौचालय घोटाळ्याचा आरोप करीत पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांनी सत्ताधारी कॉग्रेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. मागील पंचायत समिती बैठकीत यावरून वादळी चर्चा झाली होती. काही काळ बैठकीचे कामकाज ही थांबले होते. मात्र सभापती प्रमोद सावंत यांनी वेर्ले येथील शौचालय घोटाळ्याची चौकशी करण्यात येणार, असे सांगितले. त्याप्रमाणे गट विकास अधिकारी मोहन भोई यांनी कृषी अधिकारी विनायक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने गेले महिनाभर या प्रकरणाची कसून चौकशी केली त्यानंतर हा अहवाल तयार केला. मात्र दोन दिवसा पूर्वी हा अहवाल गटविकास अधिकारी भोई यांच्याकडे देणार असल्याचे या समितीने स्पष्ठ केले होते. पण अहवाल अद्यापपर्यंत देण्यात आला नाही. अखेर सोमवारी होणाऱ्या मासिक बैठकीत हा अहवाल ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. हा अहवाल पंचायत समिती बैठकीत वाचला जाणार असल्याने यावर दोषींवर कारवाई करणे पंचायत समितीला भाग पडणार आहे. मात्र अहवाल डावलला तर कॉंग्रेसकडे पुरेशे संख्याबळ नाही. कॉंग्रेसचे उपसभापती महेश सारंग, सदस्य सुनयना कासकर, नारायण राणे, विनायक दळवी आदींना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी निलंबित केले असून त्यांच्या याचिकेचा अंतिम निर्णय १ डिसेंबरला येणार आहे.
शिवसेनेने घोटाळा बहाद्दरांवर कारवाई व्हावी यासाठी मंत्रालय पातळीवर मागणी केली असून पंचायत समितीच्या प्राथमिक अहवालावर बैठकीत काय निर्णय होणार यावर पंचायत समितीचे भवितव्य अवलबंून राहाणार
आहे. (प्रतिनिधी)
सभापतींची माहिती : ‘त्यामुळे’ अहवालास विलंब
४सावंतवाडी पंचायत समितीने वेर्ले येथील शौचालयाच्या तक्रारीचा अहवाल मागवला असून हा अहवाल तयार करण्यास विलंब लागण्याचे कारण म्हणजे हा अहवाल तयार करण्यास पुरेसा अधिकारी व कर्मचारीवर्ग पंचायत समितीकडे नाही. त्यामुळे अहवालास विलंब झाला असून हा अहवाल पंचायत समिती बैठकीतच माडला जाईल. त्यावेळीच या अहवालावर विस्तृत अशी चर्चा घडवून आणली जाणार असल्याचे यावेळी सभापती प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
आम्ही आमचा कार्यकाल पूर्ण करणार : संजू परब
४पंचायत समितीवर कोणी कितीही आरोप करू दे, तेथील कारभार चांगला आहे. यापूर्वीही अनेक जण सांगत होते. पंचायत समितीवर आमचा झेंडा लागणार. पण नियतीने तसे घडू दिले नाही. आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असून, काँग्रेस कार्यकाल पूर्ण करेल याचा आम्हाला विश्वास आहे, असे मत काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले. दोडामार्गमध्ये काँग्रेसने चत्मकार घडवला, तसा चमत्कार घडवण्याची ताकद फक्त कॉंग्रेसमध्ये असल्याचा टोलाही त्यांनी शिवसेनेला हाणला.

Web Title: Sattva Examination of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.