अट्रॉसिटी प्रकरणी सत्यवान मेस्त्रीला जामीन मंजूर
By admin | Published: October 14, 2016 09:24 PM2016-10-14T21:24:51+5:302016-10-14T21:24:51+5:30
शिवडाव येथील सत्यवान अनंत मेस्त्री याला विशेष न्यायाधीश तथा जिल्हा सत्र न्यायाधीश एम.बी.तिडके यांनी 15 हजारांच्या जात मुचलक्याचा सशर्थ जामीन मंजूर केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. १५ - जातीवाचक बोलून अवमान केल्याप्रकरणी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेल्या शिवडाव येथील सत्यवान अनंत मेस्त्री याला विशेष न्यायाधीश तथा जिल्हा सत्र न्यायाधीश एम.बी.तिडके यांनी 15 हजारांच्या जात मुचलक्याचा सशर्थ जामीन मंजूर केला आहे.
शिवडाव येथील जिल्हा परिषद शाळा नं.1 मध्ये शनिवारी शारदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवडाव बौद्धवाडी येथील स्मिता नित्यानंद तांबे आपल्या सहकारी महिलांसह शाळेत आल्या होत्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान अनंत मेस्त्री याने स्मिता तांबे व त्यांच्या सहकारी महिलांना जातिवाचक बोलून त्यांचा अवमान केला होता.
त्यामुळे स्मिता तांबे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सत्यवान मेस्त्री याच्याविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा नोंद केला होता. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्याच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.