सावंतवाडीत कडकडीत बंद

By admin | Published: December 12, 2014 11:09 PM2014-12-12T23:09:50+5:302014-12-12T23:36:27+5:30

वीज वितरण विरोधात एल्गार : मूक मोर्चात महिलांचा मोठा सहभाग

Sautwantwadi cracked off | सावंतवाडीत कडकडीत बंद

सावंतवाडीत कडकडीत बंद

Next

सावंतवाडी : चालत्या दुचाकीवर विद्युत तार पडून दोन युवक जागीच मृत झाल्याच्या निषेधार्थ आज, शुक्रवारी सावंतवाडी बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत वीज वितरण विरोधात एल्गार पुकारला. अनेक व्यापारी तसेच महिलांनी मूक मोर्चात सहभाग नोंदवला. या बंदवेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंदच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातून पोलीस दाखल झाले होते.
आज, शनिवारी सावंतवाडीतील होळीचा खुंट भागात चालत्या दुचाकीवर विद्युत तार पडून संदीप गवस व सागर हुक्ेकरी हे दोन युवक जागीच मृत झाले होते. या घटनेनंतर सावंतवाडी शहरात महावितरण विरोधात मोठा उद्रेक पाहण्यास मिळाला. या घटनेला विद्युत विभागच जबाबदार असल्याचे सांगत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, मृतांच्या नातेवाइकांना तातडीने मदत द्या, दोघा युवकांच्या पत्नींना नोकरीत सामावून घ्या, अशा विविध मागण्या ठेवत या घटनेनंतर नेमण्यात आलेल्या कृती समितीने आज सावंतवाडी बंदची हाक दिली होती. तसेच मूक मोर्चा काढण्याचे जाहीर करण्यात आले होते.
त्याप्रमाणे सकाळी दहा वाजता विठ्ठल मंदिरात सावंतवाडी कृती समितीतील बाळ बोर्डेकर, नकुल पार्सेकर, उमेश कोरगावकर, संजू शिरोडकर, राजू पनवेलकर, जगदीश मांजरेकर, काशिनाथ दुभाषी, मनोज नाईक, आनंद नेवगी, सतीश नार्वेकर, राजू कासकर, अरुण भिसे, संजय पेडणेकर, शीला सावंत, संजना गावडे, आदींची बैठक झाली. या बैठकीनंतर या मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चातील नागरिकांनीतोंडाला काळीपट्टी लावत महवितरणच्या विरोधातील फलक घेतले होते. हा मूक मोर्चा विठ्ठल मंदिरातून सुरू झाला. तो त्यानंतर उभा बाजारमार्गे गांधी चौक, जयप्रकाश चौक, संचयनी असा थेट प्रांताधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.
दरम्यान, या बंदमध्ये कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच शहरातील नगरसेविका शर्वरी धारगळकर, कीर्ती बोंद्रे, वैशाली पटेकर, माधुरी मिशाळ, माजगाव सरपंच आबा सावंत, अमित परब, सुधीर आडिवडेकर, प्रशांत वाळके, प्रणील पोकळे, बबलू मिशाळ, मृत संदीप गवस यांचा भाऊ संतोष गवस, आदी सहभागी झाले होते.
बंदमध्ये रिक्षा संघटनांनी सहभाग नोंदवला.सावंतवाडी बंदमध्ये रिक्षा संघटनांनीही सहभाग नोंदवत महावितरणचा निषेध केला.
रिक्षा बंदमुळे अनेक प्रवासी एसटीतून उतरल्यावर पायपीट करताना
दिसत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Sautwantwadi cracked off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.